बैल पोळा व तान्हा पोळा निमित्त ऑनलाईन स्पर्धा

भाजप सोशल मीडियासेल तर्फे स्पर्धेचे आयोजन

0

पुरुषोत्तम नवघरे, वणी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी सार्वजनिक रित्या बैल पोळ्याचा व तान्हा पोळ्याचा कार्यक्रम होणार नाही. त्यामुळे या वर्षी भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा सोशल मीडिया सेलतर्फे बैल पोळा व तान्हा पोळ्या निमित्त आभासी (व्हर्च्युअल) सजावट स्पर्धा घेण्यात येणार आहे. यासाठी दोन्ही सणाच्या दिवशी सजावट केलेले पाच फोटो व्हाट्सअप्पवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वणी विधानसभा सोशल मीडिया तर्फे शासकीय आदेशानुसार हे दोन्ही सण साजरा करण्यात येणार नाही. त्यामुळे बळीराजाच्या आनंदावर विरजण पडू नये यासाठी सोशल मीडिया द्वारे आभासी स्पर्धा घेण्यात येणार आहे. सजावट केलेल्या तयार बैलाचे व तान्हा पोळ्यातील नंदीबैलाचे टाकलेल्या फोटो वरून दोन्ही गटात स्वतंत्ररित्या बक्षिसं ठेवण्यात आली आहेत.

यात प्रथम- 3100/-, द्वितीय-2100/-, तृतीय-1100/- रुपयांचे रोख बक्षीस व चषक देण्यात येणार आहे. सजावट केलेले फोटो वणी शहर व वणी तालुक्यासाठी अक्षय नायगावकर (सहसंयोजक, वणी विधानसभा)- 96652 10448, दिपक पाऊणकर(संयोजक,वणी तालुका)- 8668825689, कार्तिक शिवरात्रीवार- 9673462745, वैभव मेहता- 73851 64623, मारोती खारकर- 8329296122 आकाश घोडे-83810 90738,

मारेगाव तालुका साठी-संतोष जुमळे (संयोजक, मारेगाव तालुका)- 95459 53986, चंद्रशेखर मडावी- 70662 36139, आशिष खंडाळकर- 76200 78741 झरी-जामणी तालुका साठी -कृष्णा मोठ्यमवार सहसंयोजक, झरी तालुका)- 98345 02921, धिरज अग्रवाल-9922839201 या क्रमांकावर व्हाट्सअप्प द्वारा पाठविण्यात यावी असे आवाहन वणी विधानसभा सोशल मीडिया सेलचे प्रमुख प्रमोद क्षीरसागर यांनी केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.