सुशील ओझा,झरी: कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे प्रशासन हतबल झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात संपूर्ण शासन प्रशासन कामाला लागले आहे. त्यामुळे आरोग्य व पोलीस विभागाला कर्मचाऱ्यांची उणीव भासत आहे. लसीकरण करणे, लोकांची तपासणी करणे, कुठे काही घटना घडल्यास धावपळ करणे, टेम्परेचर चेक करणे, दंड ठोठावणे व इतर अनेक कामाला मनुष्यबळ लागते.
दोन्ही विभागाच्या कामाला मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जिल्हा व राज्याला जोडणाऱ्या सीमेवर नाकाबंदी करण्याचे आदेश पारित केले. त्याच अनुषंगाने पोलीस विभागाला मदत म्हणून तलाठी, ग्रामपंचायत सचिव,शिक्षक,पोलीस पाटील, आशा वर्कर यांच्या नाकाबंदी ठिकाणी नियक्ती करण्यात आल्या.
पोलीस पाटील व तलाठी यांचे कार्य कोरोना नियंत्रणावर उपाययोजना करणे, सचिव मास्कचे व दंडाची कार्यवाही करणे,आशा वर्कर टेंपरेचर चेक करणे, शिक्षक यांचे पोलिसांना मदत म्हणून राहणे तर पोलिसांच्या देखरेखीत सर्व काम करणे असे नियोजन वरिष्ठ पातळीवरून करण्यवंत आले आहे.
तीन दिवसांपासून मुकुटबन येथे बसस्टँड व कृषी उत्पन्न बाजार समिती समोर असे दोन तर पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत झरी येथील वाय पॉईंट व दिग्रस फाट्याजवळ असे दोन नाकाबंदी पॉईंट लावण्यात आले आहे. परंतु चारही पॉइंटवर पोलिसांच्या मदतीकरिता तलाठी,पोलीस पाटील,सचिव,शिक्षक व आशा वर्कर आले नाही.
केवळ मुकुटबन येथील बाजार समिती समोरील पॉईंट जवळ ग्रामपंचायतीचा एक कर्मचारी हजर होता. त्यामुळे जनतेविषयी व त्यांच्या आरोग्याविषयी किती चिंता आहे हे दिसून पडले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला किती मानतात हे सुद्धा पहायला मिळाले. कोरोना काळातही सर्वांचे पगार सुरू आहे तर काही विभागाचे कर्मचारी याना तर घर बसल्याच पगार मिळत आहे.
मग जनतेच्या सुरक्षतेकरिता लावण्यात आलेल्या ड्युटी करण्याकरिता का जात नाही ? 24 तास फक्त पोलिसांनीच ड्युटी करायची का ? असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. वरील सर्व विभागांना याबाबत माहिती नाही का, नाकाबंदी पॉइंटवर ड्युटी लावल्या नाही, की मुद्दाम आले नाही याबाबत वरिष्ठ यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
वरील विभागातील कर्मचारी यांना कोरोनाची भीती आहे , पोलिसांना नाही का? ज्या लोकांच्या ड्युट्या पोलीसांसोबत नाकाबंदी पॉइंटवर लावल्या ते जाणार की नाही याकडे लक्ष लागले आहे.मुकुटबन पोलीस स्टेशनचे ठाणेदार धर्मा सोनुने, पोलिस उपनिरीक्षक युवराज राठोड, तसेच पाटण पोलीस स्टेशनच्या ठाणेदार संगीता हेलोंडे व पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे यांनी तालुक्यातील सर्व घडामोडीवर लक्ष ठेऊन आपल्या कर्मचाऱ्यासह लक्ष ठेऊन व्यवस्थित हाताळत आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा