‘दावत-2’ फॅमिली रेस्टॉरन्टचे आज उद्घाटन

गार्डन रेस्टॉरंट, हट, इंडोर आउटडोर सिटिंग व्यवस्था, वेज- नॉनवेज डिश, स्पेशल बिर्याणी

जितेंद्र कोठारी, वणी : वणीतील सुप्रसिद्ध सेवन स्टार ग्रुपचे रेस्टॉरन्ट ‘होटल दावत’ च्या अभूतपूर्व यशानंतर ‘होटल दावत-2’ चे रविवार 19 जून रोजी शानदार उद्घाटन होत आहे. यवतमाळ रोडवर प्रिन्स लॉन्सच्या बाजूने ‘हॉटेल दावत-2’ हे व्हेज- नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरन्ट असून वणीकरांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी कोलकाता व इंदूर येथून खास शेफ रेस्टॉरन्टमध्ये बोलवण्यात आले आहे. रविवार दिनांक 19 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता ‘हॉटेल दावत-2’ चे संचालक अंसार चीनी यांच्या मातोश्रीच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

आऊटडोर आणि इंडोर सिटिंग व्यवस्था
हॉटेल दावत -2 मध्ये गार्डन रेस्टॉरंट, हट्स आणि फॅमिलीसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.  फॅमिली ओकेशन व गृपसाठी इथे स्पेशल सुटची वेगळी व्यवस्थाही केली गेली आहे. यात कॉन्फरन्स तसेच फॅमिली पार्टी किंवा ग्रुपपार्टी करता येणार आहे. याशिवाय देश विदेशातील सर्व डिश उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यात महाराष्ट्रासह, पंजाबी, बंगाली, मोघलाई, चायनिज, कॉन्टिनेन्टल, बिर्याणी इत्यादी डिश उपलब्ध राहणार आहे.

Podar School

रविवारी दिनांक 19 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता हॉटेल दावत -2 रेस्टॉरन्टचे उद्घाटन होणार असून उद्घाटनानंतर लगेच रेस्टॉरन्ट सुरु होणार आहे. त्यामुळे शहरातील तसेच परिसरातील खवय्ये तसेच फॅमिलीने एकदा अवश्य भेट द्यावी. असे आवाहन रेस्टॉरन्टच्या संचालकाकडून करण्यात आले आहे. रेस्टॉरंट दररोज दुपारी 12 वाजता पासून रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

पत्ता: हॉटेल दावत-2, प्रिन्स लॉन्सच्या बाजूने, यवतमाळ रोड, वणी
अधिक माहितीसाठी संपर्क: 7020724715, 9423131737

Sunrise
Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!