खुशखबर… ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन

युवासेनेचा उपक्रम, सहभागी होण्याचे आवाहन

0

विवेक तोटेवार, वणी: सध्या कोरोनामुळे संपूर्ण जगावर संकट आले आहे. त्यामुळे सध्या लॉकडाऊन सुरू आहे. या वेळेचा सदुपयोग करून आपल्या जिल्ह्याची भौगोलिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय इ विषयात असलेली ओळख करून देण्यासाठी युवासेनेतर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निबंध स्पर्धेचा विषय माझा यवतमाळ माझा अभिमान असा आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, पराग पिंगळे व राजेंद्र गायकवाटड यांच्या सहकार्याने जिल्हा युवा सेना प्रमुख विक्रांत चचडा यांच्या पुढाकारातून या ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात अनेक थोर व्यक्ती झाल्या आहेत. जिल्ह्याचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. या जिल्ह्याने राज्याला मुख्यमंत्रीही दिला आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असलेले स्वातंत्र सैनिक ते पांढरं सोनं पिकवणारा शेतकरी या सर्वांचाच हा जिल्हा घडवण्यात मोठा सहभाग राहिला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात आदर्श असणाऱ्या, जगण्याची प्रेरणा देणाऱ्या कोणत्याही क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीवर व्यक्तींबद्दल 1 हजार ते 1500 शब्दांचा निबंध लिहायचा आहे. हा निबंध पाठवण्याची अंतिम तारीख 15 मे 2020 असून ही स्पर्धा केवळ यवतमाळ जिल्ह्यातीलच तरुणांसाठी असून ज्या व्यक्तीवर लिहायचे आहे ती व्यक्तीची यवतमाळ जिल्ह्यातील जन्मलेली किंवा त्यांची कर्मभूम यवतमाळ असायला हवी. यात उदा. स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजकारणी, सहकारातील व्यक्ती, प्रशासकीय अधिकारी, उद्योगपती, आपले पालक, आपला मित्र, आपल्या गावातील शेतकरी इत्यादी कुणावरही लिहिता येईल. हा निबंध [email protected]
या मेल वरती पाठवायचे आहेत.

निबंधासोबत सहभाग घेणा-या स्पर्धकाचे संपूर्ण नाव आणि पत्ता, आधार कार्ड क्रमांक असणे आवश्यक आहे. या स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक बक्षिसांचीही लयलूट आहे. यात प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास 3001 द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास 2001 व तृतिय क्रमांकाच्या विजेत्यास 1001 असे पारितोषीक दिले जाणार आहे. या स्पर्धेत वणी आणि परिसरातील युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन युवासेनाचे जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.