आजपासून वृत्तपत्र वितरण पूर्ववत सुरु

मुख्याधिकारी व वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये चर्चेनंतर निघाला तोडगा

0

जितेंद्र कोठारी, वणी: मागील दोन दिवसांपासून वणी येथिल वृत्तपत्र विक्रेत्यांनी सुरु केलेले बहिष्कार आंदोलन मंगळवारी वापस घेण्यात आले. सोमवारी नगर परिषद मुख्याधिकारी संदीप माकोडे यांनी शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना बोलावून कोरोना चाचणी बाबत त्यांची गैरसमज दूर केली. त्यानंतर मंगळवार 16 मार्च पासून शहरात वृत्तपत्र वाटप करण्यात आले. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ‘वणी बहुगुणी’ने मध्यस्थीची भूमिका बजावली.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने नवीन नियमावली घोषित केली आहे. त्याच अनुषंगाने नगर परिषद मुख्याधिकारी व तहसिलदार यांनी शहरातील सर्व फळभाजी विक्रेते, दुकानदार, हॉकर्स यांना स्वतः व कामगारांची कोरोना टेस्ट करुन घेण्याची नोटीस बजावली. 21 मार्च पर्यंत कोरोना चाचणी न केल्यास आस्थापना बंद करण्याच्या इशाराही नोटिसमध्ये देण्यात आला होता.

वृत्तपत्र वाटप करणारे मुलं स्थायिक कामगार नसून रोजमजुरी किंवा कमिशन तत्वावर घरोघरी वृत्तपत्र वाटप करण्याचे काम करतात. कोरोना चाचणीच्या भीतीने मुलं कामावर येण्यास टाळाटाळ करतात. वृत्तपत्रमुळे कोरोना व्हायरसचा प्रसार होत नसल्याचे तज्ञाने तसेच यापूर्वी शासनानेसुद्दा जाहीर केले आहे.त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांना कोरोना चाचणीच्या अटीपासून वगळावे अशी मागणी वृत्तपत्र विक्रेत्यांची होती. मागणीला घेऊन शहरातील मराठी, हिंदी, इंग्रजी या सर्व वर्तमानपत्रांचे वितरण रविवार पासून बंद करण्यात आले. तसेच याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदनही देण्यात आले.

अखेर न.प. मुख्याधिकारी संदीप माकोडे यांनी सोमवार 15 मार्च रोजी वृत्तपत्र विक्रेत्यांना कार्यालयात बोलावून चर्चा केली. ववर्तमानपत्र वाटप करणाऱ्या मुलांना कोरोना टेस्ट करण्यास आणखी काही दिवस मुदत देऊ, तसेच आस्थापनेवर तात्काळ कारवाई न करण्याचेही आश्वासन मुख्याधिकारी यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना दिले. त्यामुळे मंगळवार पासून शहरात वर्तमानपत्र वितरण पूर्ववत करण्यात आले.

‘वणी बहुगुणी’ने बजावली मध्यस्थीची भूमिका
वृत्तपत्र विक्रेत्यांचे कामबंद आंदोलन बाबत वणी बहुगुणीने प्रामुख्याने बातमी प्रकाशित केली होती. वृत्तपत्र विक्रेते व प्रशासनची बाजूही बातमीत मांडण्यात आली. वणी बहुगुणीच्या मध्यस्थीने समस्येवर तोडगा निघाल्याने मुख्याधिकारी व वृत्तपत्र विक्रेत्यांनी वणी बहुगुणीचे आभार मानले आहे.

विठ्ठलवाडीतील कु. अनघा विजय दोडके झळकली शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत

शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक हाजी हारूण चीनी यांचे निधन

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.