परमडोह येथील पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम पूर्णत्वास

0 442

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील परमडोह येथील पाणी टंचाई निवारणासाठी लगतच्या पैनगंगा नदीवरून पाईपलाईनचे काम नुकतेच पूर्ण झाले. परिणामी गावातील पाणी टंचाईची समस्या दूर झाली आहे. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

एसीसी आणि ग्रामपंचायतच्या पुढाकाराने सदर काम करण्यात आले. यात सिमेंट कंपनीच्या सीएसआरचा वाटा साठ टक्के आणि परमडोह ग्रामपंचायतचा वाटा चाळीस टक्के खर्च करण्यात आला. सदर योजनेचे लोकार्पण शुक्रवारी प्रभारी सरपंच संदीप थेरे यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी मधुकर वाभीटकर, अमोल झाडे, विवेक ठाकरे, बंडू तामखाने, मारोती काकडे, विनोद येलेकर, अजब टेकाम, रवींद्र राजूरकर, आबाजी केळझरकर, शंकर हनुमंते, दिलीप ढवस आदी ग्रामस्थ उपस्थित होते

.

Comments
Loading...