आदर्श विद्यालयात शिक्षक, पालक व विद्यार्थी सभा संपन्न

शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचा त्रिवेणी संगम

0

विलास ताजने, वणी: वणी येथील आदर्श विद्यालयात शिक्षक,पालक, विध्यार्थी सभेचे आयोजन 19 ऑगस्टला करण्यात आले. विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणे ही सभेची उद्दीष्टे असून त्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी हा त्रिवेणी संगम साधला गेला पाहिजे, असे मत शिक्षक वैजनाथ खडसे यांनी मांडले.

शैक्षणिक सत्र 2017-18 करीता शिक्षक, पालक संघाची कार्यकारणी तयार करण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून पी. एन. झाडे उपाध्यक्ष देवराव किनाके, सचिव वैजनाथ खडसे, सहसचिव आशा मालिकर, अजलफा अली तसेच प्रत्येक तुकडीला एक शिक्षक व एक पालक प्रतिनिधींची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी.एन. झाडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक सुरेश घोडमारे, साधनाताई गोहोकार, देवराव किनाके, आशा मालिकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन टेंमुर्डे, संचालन वैजनाथ खडसे यांनी केले. आभार विजय शेंगर यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.