बहुगुणी डेस्क : श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पत संस्थेच्या संचालक पदासाठी येत्या 26 जून रोजी निवडणूक होणार आहे. पत संस्थेत मागील अनेक वर्षापासून काळे गटाचा एकाधिकार आहे. संस्थेचे निम्हयाहून अधिक संचालक आता वानप्रस्थ वयात पोहचले आहे. अध्यक्ष वगळता इतर संचालक फक्त नावापुरते असल्याचा आरोप होत आहे. या निवडणुकीत जुनेच संचालकांना परत संधी देण्यात आली आहे. अशातच या निवडणुकीत काळे गटाचा एकाधिकार मोडीत काढण्यासाठी उभारण्यात आलेल्या परिवर्तन पॅनेलमध्ये उच्च शिक्षित, पदवीधर व अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आहे.
परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांमध्ये 4 डॉक्टर आहेत. त्यात डॉ. मोरेश्वर पावडे, डॉ. भाऊराव कावडे, डॉ. राजेंद्र ढवस, डॉ. हेमंत खापने यांचा समावेश आहे. प्राध्यापक उमेदवार म्हणून प्रा. शाम डोये, प्रा. अविनाश घरडे तर वकील म्हणून ऍड. भास्कर ढवस उमेदवार आहे. याशिवाय तरुण व तडपदार राजकीय व सामाजिक व्यक्ती म्हणून ओळख असलेले माजी जि. प. सदस्य आशिष खुलसंगे तसेच इजहार शेख व जयकुमार आबड हे परिवर्तन पॅनलचे युवा चेहरे आहे. महिला नेतृत्व म्हणून सौ. आरती संजय चौधरी व पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भार्या सौ. नम्रता मेघशाम तांबेकर निवडणूक रिंगणात आहे.
पतसंस्थेचा कारभार अधिक पारदर्शक व स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच संस्थेत सुरु भ्रष्टाचार, एकाधिकार, भाई भतीजावाद दूर करण्यासाठी परिवर्तन पॅनल निवडणूक लढत आहे. संस्थेच्या अध्यक्ष व संचालक मंडळातील काही जवळच्या लोकांना कोट्यवधींचे कर्ज देण्यात आले आहे. त्या सर्व थकीत कर्जदारांकडून कर्ज वसूल करणे, परिसरातील बेरोजगारी दूर करण्यासाठी खनिज संपत्तीवर आधारित उद्योगांना चालना देणे, बेरोजगारांना स्वावलंबी बनविण्यासाठी सूक्ष्म व मध्यम कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे तसेच शेतकऱ्यांना शेती व्यवसायात सहकार्य करण्याचे काम परिवर्तन पॅनलचे संचालक करणार आहे. रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या खातेदार असलेल्या मतदारांनी परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांना मतदान करावा यासाठी सर्व उमेदवार व कार्यकर्ता जोमाने कामाला लागले आहे. डोर टू डोर जाऊन मतदारांची भेट घेतली जात आहे. पतसंस्थेच्या वणी, वणी ग्रामीण, मारेगाव, मुकुटबन, घाटंजी, आर्णी, यवतमाळ, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, चिमूर, मूल, ब्रह्पुरी, गडचांदूर, राजुरा येथे शाखा आहे. या सर्व शाखेतील मतदारांनी रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची पत कायम राहावी, यासाठी परिवर्तन पॅनलचे ‘कपबशी’ या बोधचिन्हावर फुलीचा शिक्का मारून सर्व उमेदवारांना विजयी करावे. असे आवाहन ऍड. भास्कर ढवस, डॉ. मोरेश्वर पावडे, डॉ. महेंद्र लोढा यांनी केले आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.