पाटण मध्यवर्ती बँक मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात १ कोटी ११ लाख १६ हजार जमा
बँक संचालक राजीव येल्टीवार यांच्या प्रयत्नाला यश
सुशील ओझा,झरी: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पाटण यांच्या मार्फत १२ एप्रिल पासून आदिवासी विकास विविध कार्यकारी १०५ सभासदांचे किसान क्रेडिट कार्ड (के. सी .सी) चे वाटप करण्याचा कार्यक्रम झाला.
तालुक्यातील १०५ शेतकऱ्यांचे २०४.४२ क्षेत्रफळानुसार १ कोटी ११ लाख १६ हजार रुपये किसान क्रेडिट कार्ड मध्ये जमा करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजीव येल्टीवार यांनी विशेष लक्ष घालून तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले.
जिल्ह्यातील पहिलेच गाव पाटण येथील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आले. व किसान क्रेडिट कार्ड वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होताच सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले व सर्व शेतकऱ्यांनी राजीव येल्टीवार यांचे आभार मानले.
निवडून येताच येल्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या कामाला चांगली सुरवात केल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे. किसान क्रेडीड कार्ड वाटप कार्यक्रमात विभागीय अध्यक्ष राजीव येल्टीवार व विभागीय अधिकारी मोहितकर यांचे मार्गदर्शनाखाली
शाखेचे निरीक्षक आर.जी. राजगडकर सचिव जी. बी. कार्नेवार व सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उदघाटन राकेश येल्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले.तर मंचकावर आदिवासी विकास कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष पोशेट्टी कतुरावार,
माजी तहसीलदार बोनगीरवार,किसन कर्नेवार,मुत्यलवार,सचिव गुंडावार,सुनील सुरकुंटवार,शाखा व्यवस्थापक मॅरवार, रोखपल एस. .बी चुकलवार, एस बुद्धेवार व बिके मॅनरवार उपस्थित होते तर आभार प्रदर्शन निरीक्षक आर जी राजगडकर यांनी केले. कार्यक्रमात सर्व शेतकरी उपस्थित होते.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा