डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरिअल मेडिकल कॉलेज येथे सौर ऊर्जा प्रकल्प

संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब ऊर्फ हर्षवर्धन देशमुख आणि मान्यवरांची उपस्थिती

0

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरिअल मेडिकल कॉलेज येथे सोमवारी सौर ऊर्जा प्रकल्पाचं उदघाटन झालं. 750 की. व्हॅट क्षमतेचा हा भव्य असा प्रकल्प आहे. संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब ऊर्फ हर्षवर्धन देशमुख, कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले साहेब, हेमंत काळमेघ आणि डॉ सोमवंशी यावेळी उपस्थित होते.

 

पहिल्या टप्यात 430 तर दुसऱ्या टप्यात 320 की. व्हॅट अशा प्रकारे प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरविले आहे. पहिल्या टप्यामध्ये, प्रती महिना साधारण 55000 युनीट एवढ्या क्षमतेने हा प्रकल्प ऊर्जा निर्मिती करणार आहे. हा प्रकल्प बिल्ट ऑपरेट अँड ट्रान्सफर ह्या तत्वावर सांगली येथील उद्योजक सर्जेरावजी यादव मे/स. सोना केमिकल ह्यांच्या सोबत करण्याचे ठरविले आहे.

हा प्रकल्प पृव्हन कंसलटिंग सर्विसेस पुणे ही कंपनी पूर्ण करणार आहे. कंपनी तर्फे जयसिंगराव देशमुख, उदय कोकाटे, संदीप बेंद्रीकर, समीर पांडे व सहकारी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.