कार्यवाहीच्या धास्तीने कृषी केंद्रातून कीटकनाशके गायब, फवारणी थांबली
कीटकनाशके उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेचे निवेदन
गिरीश कुबडे, वणी: जिल्ह्यात सध्या फवारणीमुळे शेतकरी आणि शेतमजुरांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे कृषी विभागाने कृषी केंद्रावर धाडसत्र सुरू केलं. झरी तालुक्यातही फवारणीमुळे मत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या. त्यामुळे कार्यवाहीच्या धास्तीने झरी तालुक्यातील कृषी केंद्रात कीटकनाशके औषध देणे बंद झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कीटकनाशकांचा तुटवडा होत आहे. कृषी केंद्रात कीटकनाशके मिळत नसल्याने सध्या फवारणीचे काम थांबले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ कीटकनाशक औषध उपलब्ध करून द्या अशी मागणी शिवशेनेने तहसिलदारांना निवेदनातून केली आहे.
मोठ्या प्रमाणात बोगस औषधाचा बाजारात विक्री करणाऱ्यांवर लवकरात लवकर कार्यवाही करावी, दोशींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केलीये. कीटकनाशकामुळे कित्येक शेतकऱ्यांचा जीव सुद्धा गेला आहे, त्यांना १० लाख रुपयांची तात्काळ मदत सरकारने जाहीर करावी अशी मागणीही त्यांनी केलीये.
गुरूवारी झरी तालुका शिवसेनेच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. जर दोन दिवसांत शेतकऱ्यांना कीटकनाशक औषध उपलब्ध करून दिलं नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी शिवसेना तालुका प्रमुख चंद्रकांत घुगुल यांनी दिला. यावेळी तहसिल कार्यालयात शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.