इंदिरा चौक ते ब्राह्मणी फाटा रोडवर खड्डेच खड्डे

रोडवरील खड्डे उठले नागरीकांच्या जीवावर…

0

जब्बार चीनी, वणी: इंदिरा चौक पासून ते ब्राह्मणी फाटा व निळापूर बामणी रोड वर मोठ मोठे खड्डे पडले आहे. रत्याच्या बाजूला काटेरी झुडपे वाढलेली आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. या खड्यामुळे अद्याप मोठा अपघात झाला नसला तरी किरकोर अपघात रोजच होत आहे. दुरवस्था झालेल्या या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून रस्त्यावर पडलेले सर्व खड्डे बुजविण्याचे मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

वणी शहरातील इंदिरा चौक ते ब्राह्मणी फाटा रोड हा एक महत्त्वाचा रोड आहे. शहरातून नागपूर, कोरपना हायवेवर जाण्यासाठी हा एक शॉर्टकट आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेलेल आहे. शहरात पाऊस पडला की त्यावेळी खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. त्यामुळे वाहनधारकांना रस्त्यावर वाहन चालवणे कठीण होते. खड्डेमय रस्त्यावरून वाहने चालविल्याने अनेकांची जुनी दुखणी डोके वर काढत आहे. रत्याच्या बाजूला काटेरी झुडपेही वाढलेली आहे. सात ते आठ ठिकाणी जीवघेणे खड्डे तर आहेच. पण पाच ते सहा ठिकाणी पाईपलाईनसाठी रोड खोदल्यानंतर ती व्यवस्थित न बुजविल्याने इथून चार चाकी वाहन काढण्यासाठी कसरत करावी लागते.

कोणीही या आणि रोड खोदुन जा या वृत्तीने अडीच वर्षापुर्वी बनलेल्या एका चांगल्या रोडचा सत्यानाश झाला. याबाबत नगरपरिषद प्रशासन केव्हा लक्ष देणार? असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त होत आहे. नगरपरिषद प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग देखील याबाबत उदासिन असून नागरिकांनी आणखी किती दिवस हा खड्ड्यांचा त्रास सहन करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर यामध्ये लया घालून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम त्वरित हाती घेणे आवश्यक आहे.

रस्त्यावर गतिरोधक व दुरवस्था झालेल्या रस्त्याची दुरूस्ती करा
जैन ले आऊट मधील हनुमान मंदिर ते काळे लेआऊटला जोडलेला नवनिर्मित सिमेंट रस्त्यावर गतीरोधक निर्माण करून द्यावे, तसेच काळे हॉस्पिटल ते साने गुरूजी नगरला जोडणा-या निर्माणाधीन रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. सदर रस्ता वरून पादचा-यांना चालणे अवघड झाले आहे. गेल्या आठवड्यात सदर रस्त्यावरून जात असताना अपघात होऊन एका इसमाचा जीव सुध्दा गेला आहे.

भविष्यात कोणताही अपघात होऊ नये करिता खबरदारी म्हणून सदर रस्त्यावर गतिरोधक निर्माण करून देण्यासंबंधी मुख्याधिका-यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रवी बोढेकर, प्रशांत बलकी, निखिल येरणे, निलेश करडभुजे, रूपेश चेंदे, नंदकिशोर चेंदे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.