मारेगावात प्लास्टिक जप्तीची कारवाई

दीड क्विंटलपेक्षा अधिक प्लास्टिक जप्त

0

मारेगाव: शासनाच्या शासनाच्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी मारेगाव नगरपंचायतने सुरु केली आहे. सोमवारी १० जनांच्या भरारी पथकाने शहरातील विविध भागातील व्यापारी प्रतिष्ठाणावर धाड टाकली. त्यात दिड क्विंटलपेक्षा अधिक प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे.

मारेगाव नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने मारेगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी पृथ्विराज माने पाटील यांनी या मोहिमेत कसलीही दिरंगाई न होऊ देता स्वतः हजर राहून प्लॅस्टिक जप्तीची धडक कारवाई केली, या कारवाईत शहरातुन १० जनाच्या भरारी पथकाने मटन मार्केट, आंबेडकर चौक, हायवे वरील दुकाने, गोधणी रोडचा परिसर इत्यादी ठिकाणी प्लॅस्टिक जप्तीची कारवाई केली.

मात्र या निर्णयाची अनेक जणांना माहिती नसल्याचे कारण सांगून त्यांनी कुणावरही दंडात्मक कारवाई केलेली नाही. कारवाई दररोज चालत राहणार असल्याचे नगरपंचायत प्रशासनाच्या सुत्राकडुन कळविण्यात आले आहे.

मुख्याधिकारी पृथ्वीराज माने पाटील वणी बहुगुणीशी बोलताना म्हणाले की…

शासनाचा प्लॅस्टिक बंदीचा निर्णय योग्य असुन, आरोग्याच्या दृष्टीने जनतेने प्लॅस्टिक बंद करण्यासाठी सहकार्य करावे. बंदीमुळे पर्यावरण समतोल राहिल तसेच आरोग्याच्या अनेक समस्या सुटतील. लोकांनी सहकार्य केल्यास शहराचा चेहरामोहरा बदलल्या शिवाय राहणार नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.