पोलीस, पत्रकार, नेते भाऊ आमचे, म्हणाल्या विद्यार्थीनी…

विद्यार्थीनींनी साजरा केला सामूहिक रक्षाबंधन सोहळा

0

सुशील ओझा, पाटणबोरी: पोलीस भावाप्रमाणे मुलींंचं, स्त्रियांचं रक्षण करतात. पत्रकार आमच्या समस्यांना वाचा फोडतात. आमच्या यशाचं कौतुक करतात. नेते आमच्या न्याय आणि हक्कासाठी लढतात. त्यामुळे पोलिस, पत्रकार आणि नेता हे आमचे भाऊच आहेत, या भावना विद्यार्थीनींनी व्यक्त केल्यात. लोकप्रतिनिधी, पोलीस व पत्रकार हे देशाचे मुख्य आधार आहेत. या तिन्ही स्तंभांना एकत्र आणून पवित्र रक्षाबंधनानिमित्त स्थानिक जनता हायस्कूलच्या स्काऊट-गाईडच्या १५० विद्यार्थिनींनी राखी बांधली..

पत्रकार व पोलिसांमध्ये मुस्लीमबांधवांचा सुद्धा समावेश होता. सामाजिक एकता व सहभावनाचा, सलोख्याचा संदेश देत सदर रक्षाबंधनाचा सोहळा जातीधर्माच्या भिंती तोडून माणुसकीचे भावाबहिणीचे नाते दृढ करणारा ठरला. यावेळी जनता विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सर्वमान्यवरांचा गौरव तर केलाच या सर्वांच्या छत्रछायेत सर्वमाता भगिनी सुरक्षित राहतील, अशी ओवाळणी या मुलींनी मागितली. सर्वप्रथम बॅंड पथकाने पोलीस ऑउट पोस्ट येथे सर्व गाईडस् विद्यार्थिनींचे आगमन झाले. त्यांनी लेझिमनृत्य सादर करून सर्वांची वाहवा मिळविली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विनोद निम्मलवार होते.

याप्रसंगी उपसरपंच अनिल पुलोजवार, जमादार रंगलाल पवार, जमादार सुशील शर्मा, गणेश अग्रवाल, मोबीन जाटू, सैय्यद मतीन सैय्यद जाफर, कॉन्स्टेबल अफजल खान पठाण, नागोराव राऊत, संतोष नक्षणे, मनीष अग्रवाल, शेखर सिडाम, सचिन पत्रकार, मोहन एनगुर्तीवार, गोपाल महाराज शर्मा, मोतीष सिडाम, नीलेश यमसनवार, दयाकर सिडाम, अक्षय परशावार, महेश नार्लावार आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक श्रेया तुळशीवार, ततिशा चांदेकर यांनी केले.आभार चंदना टोंगलवार हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्काऊट-गाईडच्या शिक्षिका अनिता कोरेचे, गीता कुमरे यांनी परिश्रम घेतले. कबमास्टर दिनेश घाटोळ यांनी याप्रसंगी विचार मांडले. प्लॉकलीडर शीतल आमले  कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.