राजुर कॉलरीतील मटका अड्ड्यांवर पोलिसांची धाड

दोघांना रंगेहात अटक, मटका चालकावरही गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: वणी पोलिसांनी राजुर कॉलरी परिसरात सुरू असलेल्या दोन मटका अड्ड्यांवर धाडसी कारवाई करत दोन मटका बहाद्दरांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी मटक्याचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली असून, अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याची त्यांची भूमिका स्पष्ट झाली आहे. वणी पोलिसांनी अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कंबर कसल्याचे या कारवाईतून दिसून येते.

प्रथम कारवाई ही दि. 16 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी करण्यात आली. पोह अविनाश चिकराम यांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीवरून पोलिसांनी राजुर कॉलरी वार्ड क्र. 3 येथे रायपुरे यांच्या घराजवळील मटका अड्ड्यावर छापा टाकला. तेथे शैलेश भगवान मेश्राम (वय 50) याला लोकांना मटक्याचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या देऊन पैसे घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून पावती बुक, डॉट पेन, कार्बन तुकडा आणि रोख 1520 रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणी शैलेश मेश्राम आणि मटका अड्डा चालविणाऱ्या मालकावर मजुका अंतर्गत गुन्हा दाखल झाला.

दुसरी कारवाई ही शितला माता मंदिराजवळील दुसऱ्या मटका अड्ड्यावर धाड टाकून करण्यात आली. तेथे दयाराम फत्ते यादव (वय 50) याला वरळी मटका खेळवताना रंगेहात अटक करण्यात आली. त्याच्याकडून मटका जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य आणि रोख 2050 रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणी दयाराम यादव आणि मटका मालकावरही गुन्हा दाखल झाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या दोन्ही कारवाईत पोलिसांनी एकूण 3570 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, चार मटकेबहाद्दरांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. वणी पोलिसांच्या या पावित्र्यात स्थानिकांकडून कौतुक होत असून, अवैध मटका अड्ड्यांविरुद्ध कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, मटका अड्डे चालविणाऱ्यांवर वारंवार गुन्हे दाखल होऊनही प्रतिबंधात्मक कारवाई न होणे आणि छाप्यानंतर पुन्हा मटका सुरू होणे याबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

RN सोलर सिस्टीमची झटका मशिनवर पोळा, गणेशोत्सव ऑफर सुरु

Comments are closed.