वणीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्टयावर पोलिसांची धाड

शहरातील एक प्रतिष्ठीत बिल्डर ताब्यात

0

जब्बार चीनी, वणी: शहरात सुरू असलेल्या क्रिकेटवरील सट्ट्यावर पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणी पोलिसांनी काही व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. सदर धाड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक यांच्या नेतृत्वात टाकण्यात आल्याची माहिती आहे.

वणी शहरातील गंगशेट्टीवर मंगल कार्यालय परिसर येथील आमिर बिल्डर्सच्या फ्लॅट स्किममध्ये भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट सिरिजवर सट्टा सुरू असल्याची गोपनीय माहिती यवतमाळ येथील पोलिसांना मिळाली. त्यावरून आज दुपारी साडे चार वाजताच्या सुमारास अतिरिक्त पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणी आमिर बिल्डर्सचे संचालक जमिर उर्फ जम्मू खान यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे.

प्रातिनिधिक फोटो

धाड टाकण्यासाठी मिनी बसचा वापर
सदर परिसर हा मंगल कार्यालयाचा परिसर आहे. त्यामुळे मिशन फेल न होण्यासाठी पोलिसांची चमू यवतमाळहून चिंतामणी ट्रॅव्हल्सची मिनी बस घेऊन परिसरात आले. लग्नासाठी आलेली गाडी समजून त्याबाबत कुणाला संशय आला नाही. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच आमिर बिल्डर्सच्या कार्यालयाच्या वर असलेल्या फ्लॅटमध्ये धाड टाकली. या धाडीत काही साहित्य जप्त केल्याची माहिती आहे.

सध्या जमिर खान उर्फ जम्मू यांच्या उपस्थित त्यांच्या मोमिनपुरा स्थित घराची पोलीसांद्वारे झडती सुरू असून बाहेर वणी पोलिसांचा पहारा असल्याची माहिती आहे.

one day ad 1

(अतिरिक्त माहिती येताच न्यूज अपडेट केली जाईल.) 

हेदेखील वाचा

पती हरला कॅसिनोत पैसे, पत्नीने पैसे मागताच संचालकाने केला विनयभंग

हेदेखील वाचा

निवडणुकीचा अत्यल्प दरात करा आपला किंवा आपल्या पॅनलचा प्रचार

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...