जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 6 जणांना अटक

13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील यवतमाळ रोडवरील एच.पी. पेट्रोल पम्पजवळ सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळताना 6 जणांना वणी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी जुगाऱ्यांकडून 13 हजार रुपये रोख व गंजीपत्ता जप्त केले आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपीची सुचनापत्रावर सुटका करण्यात आली आहे.

गुरुवार 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी वणी शहरात पोलीस स्टाफसह पेट्रोलिंग करीत असताना पीएसआय आशिष झिमटे यांना खबरी कडून वणी यवतमाळ मार्गावर एच.पी. पेट्रोल पंपाजवळ काही इसम पैसे लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. माहितीवरुन पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी रेड केली असता काही इसम सार्वजनिक ठिकाणी 52 गंजीपत्यावर जुगार खेळताना आढळले.

पोलिसांनी सदर ठिकाणाहून बबलू हाफिज बेग (45) रा. छोरिया ले आऊट वणी, हरदीपसिंग त्रिलोकसिंग (43), रा. रंगारीपुरा वणी, प्रदीप कुचनकर (36) रा.सोमनाळा, रवी येडलावार (43), रा. जैताईनगर वणी, संतोष कदम (42) राजूर कॉलरी, राहुल कुचनकर (46) गुरुवर्य कॉलोनी वणी यांना अटक केली. पोलिसांनी आरोपींची अंगझडती घेतली असता 13 हजार रुपये रोख मिळाले.

फिर्यादी पीएसआय आशिष किसनराव झिमटे यांच्या तक्रारीवरून वणी पो.स्टे. मध्ये रात्री 12 वाजता सर्व आरोपीवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 (अ) अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना दंड प्रक्रिया संहिता 1973, सुधारणा कायदा सन 2008 कलम 41 (1) (अ) अनव्ये नोटीस देऊन सोडण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

चक्क पत्रकार पतीनेच दिली शिक्षक पत्नीला जीवे मारण्याची सुपारी

नोकरी: शेवाळकर डेव्हलपर्समध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजेत

आपल्या भागात वारंवार पूर का येतो?

लाल सिंग चढ्ढा, रक्षाबंधन सिनेमाला झोपवणारा ‘कार्तिकेय 2’ वणीत रिलिज

Comments are closed.