भांदेवाडा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील भांदेवाडा येथे शनिवार 9 सप्टेंबर रोजी काही इसम सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. सदर ठिकाणी रेड केली असता 7 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 54 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तालुक्यातील भांदेवाडा येथील वेकोलि परिसरात काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अजित जाधव यांना मिळाली. माहितीवरून पोलीस कर्मचाऱ्यांनी जाऊन रेड केला असता सात इसम राहुल नानाजी गोरे (29), नामदेव अर्जुन आत्राम (54), मिलिंद वसंता डंभारे (45), सूर्यभान रमेश देवाळकर (26), शंकर यादव खापणे (45), चंद्रभान रमेश देवाळकर (30) सर्व रा. भांदेवाडा व पवन शेषराव बरडे (25) रा. निंबाळा यांना अटक करण्यात आली.

त्यांच्यावर कलम 12 महाराष्ट्र जुगार कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 54 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सदर कारवाई सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ पवन बन्सोड, पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या आदेशाने ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि माधव शिंदे, हरींद्रकुमार भारती, पंकज उंबरकर, सुदर्शन वानोळे, विशाल गेडाम व गजानन कुडमेथे यांनी केली.

Comments are closed.