शिंदोल्याच्या जंगलात सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी: शिंदोला लगतच्या जंगलात जुगार खेळणा-यांवर शिरपूर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत तिघांना अटक करण्यात आली तर 8 जण फरार होण्यास यशस्वी झाले. शनिवारी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी रोख रक्कम व दुचाकी असा सुमारे साडे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

सविस्तर वृत्त असे की शिंदोला गावालगत असलेल्या जंगलात काही लोक पत्ताद्वारे जुगार खेळत असल्याची माहिती खबरीकडून शिरपूर पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास घटनास्थळी धाड टाकली असता तिथे काही लोक जुगार सुरू असल्याचे आढळून आले. धाड पडताच घटनास्थळावर पळापळ सुरू झाली. मात्र यात 3 जुगारी पोलिसांच्या हाती लागले. तर काही लोक पसार होण्यात यशस्वी झाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या प्रकरणी पोलिसांनी विलास सावे (45) रा. कोलगाव, संदीप काळे (28) रा. कुरई, धनराज बलमे (29) रा. शिंदोला हे पोलिसांच्या हाती लागले तर प्रमोद टोंगे, अनिल खारकर, बालाजी निब्रड, मुन्ना पाटील यांच्यासह आणखी 4 जुगारी पसार झाले. कारवाईत 8 दुचाकी व 12 हजार 490 रुपये रोख असा एकूण 5 लाख 42 हजार 490 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिरपूर पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहे.

Comments are closed.