विवेक तोटेवार, वणी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध द. आफ्रिका या टी 20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या मॅचवर सट्टा सुरू असल्याच्या गोपनिय माहितीवर वणी पोलिसांनी शनिवारी शहरातील रंगनाथ नगर येथे धाड टाकली. या प्रकरणी दोघांना अटक कऱण्यात आली असून त्यांच्याकडून 56 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शनिवार दिनांक 23 डिसेंबर पासून टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात झाली आहे. वणीत मोठ्या प्रमाणात टी-20 सामन्यावर सट्टा खेळला जातो. याचे मोठे जाळे शहरात पसरले आहे. त्यामुळे याकडे आधीपासूनच वणी पोलिसांची नजर होती. वणी पोलिसांना रंगनाथ नगर येथे आयपीएलवर सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलीस पथकाने संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास रंगनाथ नगर येथील एका घरी धाड टाकली. तिथे सट्टा खेळण्यात येत असल्याचे त्यांना आढळून आले.
या प्रकरणी पोलिसांनी राजेश्वर सुरेश चापडे (32), साहिल अनिल झाडे (19) या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून 7 मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही व जुगाराचे साहित्य ज्याची किंमत 56 हजार 560 जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 4 व 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ, खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, संजय पूज्जलवार उपविभागीय पोलीस अधीक्षक वणी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शाम सोनटक्के यांच्या आदेशावरून सपोनी माया चाटसे, डीबी पथक कर्मचारी सुदर्शन वनोळे, अशोक टेकाडे, हरींद्र भारती, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, शंकर चौधरी यांनी केली पुढील तपास सपोनी माया चाटसे करीत आहे.
आजची मॅच ही कमी टारगेटची होती. अशा मॅचवर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळला जातो. शहरात अनेक ठिकाणी क्रिकेटवर सट्टा लावला जातो. यात मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठीत व्यक्तींचाही समावेश आहे. या बाबत ‘वणी बहुगुणी’ने गेल्या वर्षी 7 भागांची सिरीज देखील चालवली होती.
(Updated News)
हे देखील वाचा:
Comments are closed.