करणवाडी-खडकी पांदण रस्त्याची दुरवस्था

शेतक-यांना काढावी लागते चिखलातून वाट

सुरेश पाचभाई, बोटोणी: करणवाडी गावातून खडकी येथे जाणारा मुख्य पांदण रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे शेतक-यांना शेतात जाण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत शेतक-यांनी तक्रार केली होती. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

करणवाडी ते खडकी ही पांदण वाट आहे. करणवाडी ते खडकी हे 2.5 किलोमीटरचे अंतर आहे. या वाटेवर सुमारे 35 ते 40 शेतक-यांचे शेत आहे. मात्र हा मुख्य पांदण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने शेतक-यांना चिखलातून वाट काढून शेतात जावे लागते. तसेच खडकी येथे जाणा-या लोकांनाही याच रस्त्याने गावी जावे लागते.

हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी संतोष बदखल. प्रकाश जोगी, पिंटू कळसकर, विजय जोगी. दीपक तुरानकार, भास्कर गुहे. देवराव बदखल, दिलीप बदखल, रवींद्र जोगी, गणेश खडसे, ज्ञानेश्वर खडसे, गुलाब गारघाटे, अशोक गायकवाड, राजू अवताडे. बाबाराव बदखल, मनोज वैद्य, तुळशीराम मोरे, अभय उरकुडे, तुळशीराम बोबडे, देवाजी बोबडे, मनोज वडाफळे, आण्णाजी वैद्य, प्रमोद कोवे यांनी केली आहे.

हे देखील वाचा:

शेतक-यावर रानडुकराचा हल्ला, टाके मारल्यानंतर दिसला रानडुकराचा दात

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

Comments are closed.