वणी ग्रामीण रुग्णालयाला जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट

भेटीच्या दुस-या दिवशीच गलथानपणा समोर, ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभार सेनेने आणला चव्हाट्यावर

विवेक तोटेवार, वणी: सध्या वणीचे ग्रामीण रुग्णालय विविध हलगर्जी कामामुळे चर्चेत आले आहे. या अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी 28 सप्टेंबर पासून जागते रहो हे आंदोलन सुरु केले आहे. 13 दिवस हे आंदोलन चालणार आहे. या आंदोलना दरम्यान शिवसेनेने रुग्णालयाचा गलथानपणा चव्हाट्यावर आणला होता. त्याची दखल घेत शुक्रवार दि. 30 सप्टेंबरला यवतमाळ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंग तुषार वारे यांनी भेट दिली. यावेळी रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरमध्ये डॉ. वारे यांनी बैठक घेतली. यावेळी संजय देरकर, सुनील कातकडे, अजिंक्य शेंडे, बंटी ठाकूर व संपूर्ण मेडिकल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत डॉ. वारे यांनी समस्या सोडविण्याची हमी दिली. मात्र डॉ. वारे यांच्या भेटीच्या दुस-याच दिवशी रुग्णाच्या हातावर टाके मारल्यानंतर जखमेच्या आत रान डुकराचा दात आढळून आल्याची घटना समोर आली आहे. 

बैठकीत उपस्थितांनी रुग्णालयातील तक्रारीचा पाढा वाचला. रुग्णालयात चोवीस तास एक वैद्यकीय अधिकारी हजर राहणे, बंद असलेले सिझेरियन (प्रसूती) त्याकरिता आज भुलतज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी. रुग्णालयात पूर्णवेळ स्त्री रोगतज्ञ अधिकारी उपलब्ध करावी, रुग्णालयात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कर्तव्याच्या वेळा निश्चित करून दर्शनस्थळी फलक लावाव्या. अत्यावश्यक काळातील वैद्यकीय अधिकारी वगळता इतर वैद्यकीय अधिकारी दोन्ही वेळ दवाखान्यात उपलब्ध राहतील. तसेच रुग्णांना सतत रेफर करणे इत्यादी बाबींवर चर्चा करण्यात आली.

Podar School

यावेळी प्रसूतीसाठी लागणाऱ्या औषधी साठा रुग्णास विनामूल्य उपलब्ध केला जाईल, आवश्यक असलेल्या लसी, औषधसाठा रुग्णालयात ठेवला जाईल. रूग्णांना सतत रेफर करण्या ऐवजी रुग्णालयात योग्य तो उपचार केला जाईल तसेच शासन निर्णयानुसार वणी करिता मंजूर झालेले 100 खाटांचे रुग्णालय कार्यान्वित करणे याबाबतत पाठपुरावा कऱण्याचे आश्वासन डॉ. वारे यांनी दिले.

यावेळी संतोष कुचनकर, मनीष बतरा, हेमंत गौरकार, पियुष चव्हाण, सतीश कोंडे, गणेश जनेकर, किशोर थेरे, राहुल झट्टे, निखिल तुराणकर, जनार्धन थेटे, मंगल भोंगळे, अभि नागपुरे, वजीर खान, निजात शेख, शादाब अहेमद, शाहिद शेख, निजात शेख, ईत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

भेटीच्या दुस-या दिवशीच गलथानपणा समोर
निवली येथील एका शेतक-यावर रानडुकराने हल्ला केला होता. त्याच्यावर एक्सरे न करताच टाके मारण्यात आले होते. त्यानंतर एक्सरे मध्ये डुकराचा दात आढळून आला होता. विजय पिदूरकर आणि राजू तुराणकर यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. हा प्रकार डॉ. वारे यांच्या भेटीच्या दुस-याच दिवशी समोर आला. त्यामुळे भेटीचा कोणताही परिणाम रुग्णालयातील कारभारावर झालेला दिसून येत नाही. ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेनेतर्फे जागते रहो आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलन अंतर्गत रुग्णालयातील गलथान कारभार चव्हाट्यावर आणण्यात आला होता.

हे देखील वाचा:

शेतक-यावर रानडुकराचा हल्ला, टाके मारल्यानंतर दिसला रानडुकराचा दात

गोडगाव शिवारात वाघाचा गायीवर हल्ला, गाय ठार

Sunrise
Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!