स्नेहनगरीत झुकलेला खांब देतोय दुर्घटनेला आमंत्रण

महावितरणचा भोंगळ कारभार, तक्रार देऊनही समस्या सोडवण्यास टाळाटाळ

0

विवेक तोटेवार, वणी: शहरातील स्नेहनगरी येथील विद्युत खांब जवळपास दोन महिन्यांपासून झुकलेला आहे. याबाबत कॉलनीतील लोकांनी तक्रार दिली. परंतु महावितरण कर्मचारी ही समस्या सोडवण्यास टाळाटाळ करीत आहेत. विद्युत खांब पडल्यास मोठी हानी होण्याची शक्यता आहे. एखादी दुर्घटना झाल्यावर महावितरणला जाग येणार का? असा संतप्त सवाल स्नेहनगरीतील रहिवाशी उपस्थित करीत आहे.

शहरातील ओम नगरी जवळ स्नेहानगरी आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून येथील मुख्य रस्त्यावरील विद्युत खांब झुकलेला आहे. या कॉलनीतील सुजाण व्यक्तींनी याबाबत महावितरण कार्यालयात 11 जून रोजी तक्रार दिली. परंतु त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवण्यात आली. या खांबाच्या बाजूला घरे आहेत. खांब पडल्यास मोठी हानी होण्याची शक्यता असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

शिवाय या खांबावरीत पथदिवे पूर्णपणे बंद आहे. याबाबत नगर परिषद मुख्याधिकारी यांना तक्रार दिली आहे. परंतु विद्युत पोल झुकलेला असल्याने नगर परिषद कर्मचारी पोलवर चढून दुरुस्ती करण्यास नकार देत आहेत. या सर्व प्रकारचा त्रास कॉलनीतील जनतेला सहन करावा लागत आहे.

पथदिवे बंद असल्याने जनतेला अंधारातच वाट शोधावी लागते. याबाबत अनेकदा नगर सेवक व नगर परिषद यांच्याकडे तोंडी व लेखी तक्रार देण्यात आल्या. परंतु अजूनही नगर परिषद व महावितरण यांना जाग आली नाही. जर तात्काळ महावितरण विभागाने ही समस्या सोडवली नाही तर मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा कॉलनीतील रहिवाशांनी दिला आहे.

हे देखील वाचा:

येनक खून प्रकरणाचे गुढ उलगडले, अवघ्या दोन तासांमध्ये प्रकरणाचा छडा

आई वडिलांच्या मृत्यूनंतर पोरका झालेल्या पिंटूला मिळाली आर्थिक मदत

Leave A Reply

Your email address will not be published.