आई वडिलांच्या मृत्यूनंतर पोरका झालेल्या पिंटूला मिळाली आर्थिक मदत

माहिती अधिकार कार्यकर्ते सूरज गज्जलवार यांच्या प्रयत्नांना यश

0

विवेक तोटेवार, वणी: गावाहून परत येत असताना अंगावर वीज कोसळून आईवडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात असलेला मुलगा पोरका व निराधार झाला. ही घटना वणीतील समाज सेवक सूरज गज्जलवार यांना माहिती पडताच त्यांनी यासाठी प्रयत्न केले व प्रकरणाचा पाठपुरावा केला. अखेर आईवडिलांचे छत्र हरवलेल्या मुलाला 8 लाखांची मदत मिळाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, मोतीलाल राऊत (31) आणि गुंजनवा पिंटू राऊत (27) रा. पळसगाव ता. ब्रह्मपुरी हे दाम्पत्य काही कामानिमित्त ब्रम्हपुरी इथे गेले होते. काम आटपून ब्रम्हपुरी वरून गावाकडे परत जात असताना त्यांच्या वर वीज कोसळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मागे त्यांचा एक वर्षाचा मुलगा अनाथ झाला.

याबाबतची माहिती वणी चे माहिती अधिकार कार्यकर्ते आणि समाजिक कार्यकर्ते सूरज गज्जलवार यांना कळली. त्यांनी पिंटूच्या लहान मुलाला काय मदत होऊ शकते या कडे लक्ष दिले आणि त्याच्या संपर्कामध्ये असलेले माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना त्यांनी निवेदन दिले. सुधीर मुनगंटीवार यांनी याची दखल घेत तत्काळ जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केला.

सूरज यांनी त्याच दिवशी विजय वड्डेटीवार यांना सुद्धा यासंदर्भात पत्र व्यवहार केला. वडेट्टीवार यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. वर्षाअखेर त्या 1 वर्षाच्या मुलाला 8 लाख रुपयांचा चा धनादेश मिळाला. त्याला जीवन जगण्यासाठी एक आधार मिळाला. या कार्याबाबत सूरज गज्जलवार यांचे कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या अनेक शैक्षणिक प्रश्नांना याआधी सूरज गज्जलवार यांनी वाचा फोडली आहे.

हे देखील वाचा:

येनक खून प्रकरणाचे गुढ उलगडले, अवघ्या दोन तासांमध्ये प्रकरणाचा छडा

घरी पाहुणा म्हणून आला… मुलीला गर्भवती करून गेला… !

Leave A Reply

Your email address will not be published.