जितेंद्र कोठारी, वणी: तब्बल 2 महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर वणी पोलीस स्टेशनला नवीन ठाणेदार मिळाले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक पवन बनसोड यांनी पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांना वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पदाची जबाबदारी सोपवली आहे. पोनि शिरस्कर यांनी शनिवारी दुपारी 4.30 वाजता वणी पोलीस स्टेशनचा प्रभार हाती घेतला. ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांना 14 ऑक्टो. 2022 रोजी वैधकीय रजेवर पाठविण्यात आले. तेव्हापासून पोलीस स्टेशनचे प्रभार सहा.पोलीस निरीक्षक माया चाटसे सांभाळत होत्या. शहरात वाढती गुन्हेगारी बघून आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी पोलिस महानिरीक्षक यांना फोन करून वणी पोलीस ठाण्यात लवकरात लवकर ठाणेदाराची नियुक्तीची मागणी केली. नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांनी जिल्हा स्पेशल ब्रँच व स्थानिक गुन्हा शाखा प्रमुख पदावर काम केले आहे. LCB मध्ये असताना त्यांनी अनेक गुन्ह्याचा छडा लावला होता. ववी पोलीस स्टेशनला ठाणेदार मिळाल्याने वणीकरा़नी समाधान व्यक्त केले आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.