झरी येथे परधान समाजबांधवाची बैठक 15ला

समाजातील पदाधिकारी व बांधवानी बैठकीला येण्याचे आवाहन

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील परधान समाजबांधवाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
परधान समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष दयाकर गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली 15 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता झरी येथील पोयाम यांच्या घरी ही बैठक होईल.

एकता, सामाजिक उपक्रम, सामाजिक प्रश्न, समस्या तसेच वीर बाबुरावजी मडावी यांच्या स्मरणार्थ झरी येथे स्थापित होण्याऱ्या अर्धपुतळ्याची वर्गणी, निधी यांसह अनेक विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच समाजाच्या इतर समस्यांबाबतसुद्धा चर्चा करण्यात येणार आहे.

तरी परधान समाजबांधव, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, तरूणांनी या बैठकीला आवर्जुन उपस्थित राहावे. अशी विनंती तालुका अध्यक्ष दयाकर गेडाम यांनी केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हेदेखील वाचा

‘तिला’ झाली गर्भधारणा तरीही “हा” लग्न करेना

हेदेखील वाचा

वांजरी रोड मर्डर केसचा लागला छडा, प्रियकरास अटक

Leave A Reply

Your email address will not be published.