शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

कोरोनायोद्धा आणि कतृत्त्ववान व्यक्तींचादेखील सत्कार

0

नागेश रायपुरे, मारेगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र   पवार यांचा ८० वा जन्मदिवस मारेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने साजरा झाला. त्यानिमित्त रक्तदान शिबिर व विविध सामाजिक कार्यक्रम झालेत.

यासोबतच समाज घडविण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांचा व कोरोनातील चांगले कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानपत्र व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

55 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. मारेगाव येथील रक्तदान शिबिरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणिस डॉ. महेन्द्र लोढा यांनी आपल्या टीमसह रक्तदान करून सामाजिक कर्तव्य निभावले. पवार यांच्या जन्मदिवसाच्या मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण स्क्रिनवर दाखविण्यात आले.

यावेळी कोरोनायोद्ध्यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने करण्यात आला. नागपूर येथील लाईफलाईन रक्तपेढीचे डॉ. अपर्णा सागरे, धीरज खरवडे, कुणाल शिंदे, सिद्धार्थ गजभिये, कोमल जामगडे, राणी पाटील यांनी काम पाहिले. यावेळी अंकुश माफुर, भारत मत्ते, सुरेखा भदिकर (भेले), जिजाबाई वरारकर, दयाल रोगे, मुन्ना शेख, आकाश भेले, नितीन गोडे ,नागेश रायपुरे, आशीष येरणे, अनिल गेडाम आदींनी परिश्रम घेतले.

हेदेखील वाचा

वांजरी रोड मर्डर केसचा लागला छडा, प्रियकरास अटक

हेदेखील वाचा

‘तिला’ झाली गर्भधारणा तरीही “हा” लग्न करेना

Leave A Reply

Your email address will not be published.