तालुका प्रतिनिधी, वणी: लगतच्या गणेशपूर येथील प्रवीण मधुकर बोबडे (43) यांचे दि. 28 सोमवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. अचानक सोमवारी पहाटे प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी कोरोना टेस्ट करण्याकरिता नेण्याचा सल्ला दिला. कोविड केंद्रात तपासणी दरम्यान कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले.
त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ आणि बराचसा आप्त परिवार आहे. प्रवीण बोबडे हे धोबी समाजाचे तालुका अध्यक्ष होते. तसेच रंगनाथ स्वामी पतसंस्थेत अभिकर्ता म्हणून काम करीत होते. अत्यंत मनमिळाऊ स्वभावामुळे जनमानसात त्यांची ख्याती होती. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कदाचित प्रवीण बोबडे यांच्यावर खासगी रुग्णालयात तत्काळ उपचार केल्या गेले असते. तर योग्य उपचाराने त्यांचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. प्रवीण बोबडेंच्या अकस्मात निधनाने मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)