प्रवीण उंबरकर यांची जिल्हा कंत्राटदार संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
अमित उत्तरवार सचिव व रुपेश गुल्हाने यांची कोषाध्यक्षपदी निवड
जितेंद्र कोठारी, वणी : यवतमाळ जिल्हा कंत्राटदार (कल्याण) संघटना (रजी नं 2274) च्या अध्यक्ष पदावर वणी येथील शासकीय कंत्राटदार प्रवीण उंबरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बुधवार 11 जानेवारी रोजी यवतमाळ येथील नवजीवन मंगल कार्यालयात पार पडलेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व कंत्राटदाराने पुढील 3 वर्षांकरिता प्रवीण उंबरकर यांची एकमताने अध्यक्ष पदावर निवड केली. संघटनेच्या सचिव पदावर यवतमाळ येथील कंत्राटदार अमित उत्तरवार व कोषाध्यक्ष पदावर रुपेश गुल्हाने यांचीही निवड बिनविरोध करण्यात आली.
यवतमाळ जिल्हा कंत्राटदार कल्याण संघटना कंत्राटदारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात. जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, कृषी विभाग, सिंचन विभाग व इतर शासकीय विभाग अंतर्गत ठेकेदारी करणारे कंत्राटदार या संघटनेचे सदस्य आहे.
यवतमाळ जिल्हा कंत्राटदार कल्याण संघटनेचे मावळते अध्यक्ष अरविंद वाढोणकर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण उंबरकर यांना पुढील कार्यकालसाठी शुभेच्छा दिली. विशेष म्हणजे यवतमाळ जिल्हा कंत्राटदार कल्याण संघटनेचा अध्यक्ष पद पहिल्यांदा वणी विभागाला मिळाला आहे. प्रवीण उंबरकर यांची अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल जिल्ह्यातील कंत्राटदार व मित्र परिवाराकडून शुभेच्छांचे वर्षाव होत आहे.
Comments are closed.