मनसेच्या रोजगार महोत्सवात अर्ज धारकांसाठी आज मुलाखत पूर्व प्रशिक्षण
दहा हजार पेक्षा जास्त सुशिक्षित बेरोजगारांनी केली नोंदणी
जितेंद्र कोठारी, वणी : वणी विधानसभा क्षेत्रातील बेरोजगार युवक युवतींसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रोजगार महा मेलाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या कंपन्यामध्ये नोकरी इच्छुक उमेदवारांनी इंटरव्ह्यूसाठी तयारी कशी करावी ? मुलाखतकर्त्या समोर कसे जायचे ? त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर कशी द्यायची ? याबाबतीत मुलाखत पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शुक्रवार 13 ऑगस्ट रोजी येथील शेतकरी मंदिर सभागृहात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
वणी विधानसभा क्षेत्रात डब्ल्यूसीएल व खाजगी कोळसा खाणीसह अनेक उद्योगधंदे अस्तित्वात आहे. परंतु कंपन्यांमध्ये नोकरीसाठी स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य दिले जात नाही. त्यामुळे येथील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्याकडून रोजगार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . देशभरातील 50 पेक्षा जास्त नामांकित कंपन्या व उद्योग संस्था या महोत्सवात सहभागी होणार आहे. पात्र उमेदवारांना मुलाखतीनंतर कंपन्यांनाकडून रोजगार उपलब्ध करुन देणार आहे.
13 ऑक्टो. रोजी आयोजित मुलाखती पूर्व प्रशिक्षण शिबिर वणी शहर व जवळपासच्या गावातील अर्जधारकांसाठी आहे. विधानसभा क्षेत्रात उर्वरित ग्रामीण भागातील अर्जधारकांसाठी पंचायत समिती निहाय प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाणार आहे . मेळाव्याच्या पुढील तारखा वेळापत्रकानुसार प्रसिद्ध कऱण्यात आल्या आहे. त्यानुसार पुढील मेळावे पार पडणार आहे.
रोजगार महोत्सवात वणी विधानसभा क्षेत्रातील 10 हजारपेक्षा जास्त बेरोजगार युवक युवतींनी अर्ज नोंदणी केली आहे. ज्या बेरोजगार युवकांनी अद्याप ही आपली नोंदणी केलेली नाही, ते प्रशिक्षण मेळाव्यात आपली नोंदणी करू शकता. अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
Comments are closed.