दीपक चौपाटीवर रात्री राडा, एकाला बेदम मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील दीपक चौपाटी परिसरात शुल्लक कारणावरून राडा झाला. या घटनेत पानटपरी चालकाला दोघांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. दुकानासमोर होत असलेल्या टवाळखोरीमुळे हटकल्यातून ही मारहाण झाली. बुधवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

दीपक चौपाटी परिसरात असलेल्या एका पानटपरीवर रात्री 10.30 वाजताच्या सुमारास काही तरुण दारुच्या नशेत आले. ते टपरीसमोर शिविगाळ करीत होते. दुकानासमोर होत असलेली शिविगाळ पाहून टपरी चालकाने तरुणांना तिथून जाण्यास सांगितले. यावरून त्यातील दोन तरुणांनी टपरी चालकाला बेदम मारहाण केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

राडा झाल्याचे पाहून लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यातील काहींनी याची माहिती पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पोलीस येताच घटनास्थळावरून नागरिकांनी पळ काढला. तरुणाने केलेल्या मारहाणीत टपरी चालक जखमी झाला आहे. दीपक चौपाटी परिसरात असणा-या गुंड प्रवृत्तीच्या व टवाळखोरी करणा-या तरुणांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील लोक करीत आहे.

हे देखील वाचा: 

 

Comments are closed.