जब्बार चीनी, वणी: आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान शहरातील शिवाजी चौक, मार्केट रोड येथील माहेर कापड केंद्र येथे प्रशासनाने धाड टाकली. यावेळी तिथे ग्राहकांची जत्रा आढळून आली. या प्रकरणी दुकानदारावर 50 हजारांचा दंड आकारण्यात आला तर 20 ग्राहकांवर 200 रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती आहे.
सध्या लग्नाचा सिजन सुरू आहे. लग्नासाठी केवळ 25 लोकांमध्ये लग्न आवरण्याचा आदेशही प्रशासनाकडून आला आहे. मात्र तरीही लग्नासाठी कपड्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह मात्र तसूभरही कमी झालेला नाही. सकाळी प्रशासनाला शहरातील माहेर कापड केंद्र येथे शटर बंद करून आत मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी असल्याची माहिती मिळाली. यावरून महसूल, पोलीस व नगरपालिकेच्या टीमने सकाळी 9 वाजताच्या दरम्यान माहेर कापड केंद्रावर धाड टाकली.
दरम्यान तिथे कपड्यांच्या खरेदी साठी मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी गर्दी केल्याचे आढळून आले. दुकानाचे शटर बंद करून ग्राहकांना दुस-या मार्गाने आत घेत इथे कपड्यांची विक्री असल्याचे आढळून आले. कर्मचारी व ग्राहक अशी मोठी जत्राच या ठिकाणी भरलेली होती. या प्रकरणी नगर पालिकेतर्फे दुकानावर 50 हजारांचा दंड आकारण्यात आला. तर 20 ग्राहकांवर 200 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. सुमारे 54 हजारांचा दंड यावेळी वसूल करण्यात आला.
या दुकानाला सिल ठोकण्यात आले आहे. सदर कारवाई तहसीलदार विवेक पांडे, ना. तहसीलदार ब्राह्मणवाडे, ठाणेदार वैभव जाधव व मुख्याधिकारी रामगुंडे यांच्या पथकाने केली. लॉकडाऊनच्या नियमांचे भंग करणा-या व्यापारी प्रतिष्ठानावर 50 हजारांचा दंड आकारण्याचे आदेश आल्यानंतर शहरातील ही पहिलीच कारवाई आहे. सोमवारी मारेगाव येथील एका व्यापारी प्रतिष्ठानावर 50 हजारांचा दंड आकारण्यात आला होता.
हे देखील वाचा: