नांदेपेरा रोडवरील मटका जंत्रीवर यवतमाळ पोलीस पथकाची धाड

21 आरोपींना अटक, 13.6 लाखांचा मुद्देमाल जप्त... अलिकडच्या काळातील सर्वात मोठी कार्यवाही

जितेंद्र कोठारी, वणी: गुरुवारी रात्री वणीतील नांदेपेरा रोड वरील एका ले आऊटमधल्या वास्तूतून चालणा-या मटका जंत्रीवर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत 21 जणांना अटक करण्यात आली. या कार्यवाहीत साडे तेरा लाखांपेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कार्यवाही यवतमाळ येथील सायबर सेल व पथकाद्वारे करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की वणीतील एक मटका व्यावसायिकांनी नुकतिच त्याची मटका जंत्री चंद्रपूर जिल्ह्यातून वणीत हलवली होती. याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षकांना प्राप्त झाली. त्यावरून पोलीस अधिक्षकांनी एका पथकाकडे याची जबाबदारी देत त्यांना ही खबर पक्की करण्याचा आदेश दिला. त्यावरून सपोनि अमोल पुरी, सायबर सेल व पथक हे कामाला लागले. शुक्रवारी दिनांक 5 मे रोजी सदर पथक वेशांतर करून रेकी करण्यासाठी नांदेपेरा रोडवरील एका ठिकाणी चालणा-या मटका जंत्रीवर गेले. तिथे त्यांना मटका सुरू असल्याची खात्री पटताच सदर पथकाने तिथे धाड टाकली.

या कार्यावाहीत विशाल पिसे, फरदीन अहेमद, अनिकेत काकडे, मोहन काकडे, ज्ञानदेव बावणे, संजय ढुमणे, राजेश शिवरात्रीवार, शेख साजिद, शेख युनुस, अनिल लोणारे, मुजिबूर रहेमान, रौफ रहेमान, प्रणाल पारखी, गजानन चित्तलवार, दीपक पचारे, महेश टिपले, दिलावर शेख, अतिक अहेमद, सूरज सातपुते, सईद साबिर, गौरव नागपुरे अशा 21 जणांना अटक केली. तर जंत्री चालक हा घटनास्थळी आढळून आला नाही.

पोलिसांनी घटनास्थळावरून 3 लॅपटॉप, 4 प्रिंटर, 17 दुचाकी, 53 मोबाईल व 61590 रुपये नगदी सह एकूण 13 लाख 62 हजार 905 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकऱणी मटका पट्टी चालक मिनाज व 21 जणांवर मजुका कायद्याच्या कलम 4 व 5 व सहकलम भादंविच्या 109 अंतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भूजबळ पाटील व अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. के ए धरणे यांच्या मार्गदर्शनात सपोनि अमोल पुरी, सपोनि सारंग बोम्पिलवार, सपोनि प्रकाश पाटील, सपोनि विकास मुंढे, पो अंमलदार गजानन डोंगरे, विशाल भगत, कविष पाळेकर, पंकज गिरी, अजय निंबोळकर, इफ्राज काजी, विजय मलमकार, देवेंद्र गोडे, प्रवीण कुथे यवतमाळ यांनी पार पाडली.

हे देखील वाचा:

अपघात: नांदेपेरा रोडवर दुचाकीची समोरासमोर धडक

वणीत प्रोफेशनल मेकअप व हेअर स्टायलिंग वर्कशॉप

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.