बंद बारमधून दारू काढून तस्करी, एकाला अटक दोघे फरार

सावर्ला जवळील व्ही व्ही बारवर कारवाई

0

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 19 एप्रिल रोजी तालुक्यातील वरोरा रोडवर स्थित एका बारमधून दिवसाढवळ्या दारू काढून विकणाऱ्या बार मालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील बारमालक व एक आरोपी फरार झाला तर एकास अटक करण्यात आली आहे.

वरोरा रोडवरील सावर्ला येथे स्थित व्ही व्ही बार अँड रेस्टारंट येथून दारू तस्करी होत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला व दुपारी 4 वाजताच्या दरम्यान सदर बारवर धाड टाकली. या ठिकाणी एक चारचाकी वाहन (MH 31 K 4501) सह 1 लाख 85 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत आरोपी सुधाकर सोनवणे यास अटक करण्यात आली आहे. तर यातील बारमालक प्रवीण सरोदे व बादशाह नामक आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

महत्वाचे म्हणजे लॉकडाऊन मुळे सर्व बार, वाइन शॉप बंद आहेत अवैधरीत्या दारू विक्री होऊ नये म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाने बारला सील लावले आहे. परंतु दारू विक्री करणारे बारमालक हे एका खिडकीतून दारू काढून त्याचा अवैध व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत आहे. व्ही व्ही बार चे सील जसेच्या तसे होते तरीही दारू विक्री सुरूच असल्याचे चित्र समोर आले आहे. 

सदर कारवाई डॉ दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधीक्षक, खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक, संजय पुजलवार उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन लुले ठाणेदार शिरपूर, विजय वानखेडे, प्रदीप ठाकरे, इकबाल शेख, रवी इसनकर, परेश मानकर, संतोष कालवेलवार, राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक नारायण सुर्वे, सतीश गाडगे यांनी केली.

हे देखील वाचा:

मोहद्यामध्ये कोरोनाचे तांडव, एकाच दिवशी आढळले 32 रुग्ण

वणीतील खासगी लॅबकडून सीबीसी टेस्टबाबत रुग्णांची लूट

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.