राजू जयस्वाल यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन

मारेगावात पसरली शोककळा

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथील प्रतिष्टीत व्यापारी राजू नंदलाल जयस्वाल यांचे आज दिनांक 14 ऑक्टोबर बुधवारी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान ह्रदय विकाराचे धक्क्याने निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनाने शहरात शोककळा पसरली आहे.

त्यांना शुगर व बीपीचा त्रास होता. मंगळवारी त्यांची प्रकृती अचानक धासळली. त्यामुळे त्यांनी वणीतील एका खासगी दवाखान्यात येऊऩ चेकअप केले होते. मात्र आज ही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना नागपूर येथे हलवण्याचा निर्णय घेतला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

नागपूर येथे उपचारासाठी जात असताना वणी जवळ त्यांना अचानक हृदय विकाराचा धक्का आला. दरम्यान त्यांना वणीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली होती.

राजू जयस्वाल हे शहरातील प्रतिष्ठित किराणा व्यापारी होते. याशिवाय ते राजकारणातही सक्रिय होते. ते भाजपचे कार्यकर्ते होते. शहरात कोणत्याही सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात त्यांचा मोठा हातभार असायचा. त्याच्या अचानक निधनाने परिसरात मनमिळावू व्यक्ती सोडून गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, भाऊ, पुतण्या असा आप्त परिवार आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

Leave A Reply

Your email address will not be published.