आत्महत्या हा पहिला किंवा शेवटचाही मार्ग नाही…

टेन्शनमध्ये राहू नका ’ह्यांना’ कॉल करा, 'वणी बहुगुणी'चा उपक्रम...

1

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः आत्महत्या हा पहिला किंवा शेवटचाही मार्ग नव्हे कोणत्याही समस्येवरचा. त्यासाठी कुणाशीतरी बोललं पाहिजे. कुणाशी बोलाल? तर उत्तर आहे 9922001122, 02225521111, 1800-599-0019, 9422627571, 8275038382 हे नंबर्स. या नंबरवर कॉल करा. आपली समस्या सांगा. एक्स्पर्टस् मोफत मार्गदर्शन करतील. दिशा दाखवील. तुमच्या प्रॉब्ल्मेसची तीव्रता कमी झाल्यासारखी होईल. नव्याने लढण्याची, उभं राहण्याची उमेद मिळेल. केवळ आत्महत्यासारख्या विषयावरच नाही तर मानसिक ताणतणाव यासाठीही या क्रमांकावर आपल्याला कॉल करून मदत घेता येणार आहे.

वणी, मारेगाव आणि झरी तालुकाच नव्हे तर सर्वत्रच आत्महत्यांचं प्रमाण वाढत आहे. गेल्या दोन तीन महिन्यात परिसरात आत्महत्येचे प्रमाण अचानक वाढले आहे. बदलती दिनचर्या, कौटुंबिक, आर्थिक, भावनिक, सामाजिक अषी त्यामागे विविध कारणं असू शकतात. आपण कुणाही जवळ आपली समस्या सांगत नाही. बोलून दाखवत नाही. ती व्यक्त केलीच पाहिजे. मानसिकरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. अनेकांचा पैशांअभावी हे शक्य होतही नसेल. त्यांच्यासाठी ही हेल्पलाईन सुरू करण्यात आलीय.

बोलून प्रश्न सुटत नाही, असं म्हणतात. मात्र बोलल्याने मनावरचं ओझं हलकं होतं. ते थोडं हलकं झालं, की त्यावर उपाययोजना करणं शक्य होतं. मनातला गोंधळ कुणाला सांगावा हाही प्रश्न पुढे असतो. म्हणून ही हेल्पलाईन आहे. केवळ आत्महत्याच नाही तर मानसिक तणाव दूर करण्यासाठीच्या समुपदेशनासाठीही आपण इथे कॉल करू शकता.

9922001122 (12 PM to 8 PM) 022 25521111 (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायंस Monday to Saturday: 8 AM to 10 PM) 1800-599-0019 (किरण- नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्रॅम, केंद्र सरकार) 9422627571, 8275038382 या नंबरवर कॉल करून तुमची समस्या बिनधास्त सांगा.

तुमचा विषय गुप्त ठेवण्यात येतो. त्यासंदर्भात कुठे चर्चा केली जाणार नाही. एक्स्पर्टसोबत तुम्ही मनमोकळं बोलू शकता. किंबहुना बोललंच पाहिजे. संकटं येतील आणि जातीलही. आयुष्य मात्र एकदाच मिळतं. ते असं गमवायला नको. दोन शब्द समस्याग्रस्तांना नव्याने जगण्याची ताकद देतील.

आज लॉकडाऊनने अनेकांची आर्थिक घडी विस्कळीत केलीय. अनेकांचा रोजगार, धंदा बुडाला. छळणारं रिकामपण आलंय. नैराश्य वाढत चाललंय. असं असलं तरी या प्रत्येक गोष्टीवर सोल्यूषन आहे. हे विसरून चालणार नाही. आपला जीव आणि आयुष्य महत्त्वाचं. ‘जान है तो जहान है’ हे लक्षात ठेवायला हवं. आपण आपल्याला मानसिकदृष्ट्या जपलं पाहिजे. समस्येच्या एवढ्याशा नाजूक काळात स्वतःला सांभाळता आलं पाहिजे.

सध्या अनेकजण थांबलेले आहेत. थांबणे म्हणजे संपणे नव्हे. नव्या वेगाने काम करण्यासाठी ऊर्जा तयार करण्याचा हा काळ समाजावा. नव्या पर्वाची तयारी करावी. मनातलं शेअर करा. आपल्या आयुष्यात कोणत्याही समस्या असोत. या नंबरवर कॉल करा. आपल्याला काही ना काही सकारात्मक हाती लागेलच. अंधारानंतर पहाट येतेच. प्रतीक्षा करा पहाटेची. नव्या उमेदीची.

तणावाचा विस्फोट झाला, की अनेकजण आत्महत्या करतात. हा तणाव, ही आत्मत्या टाळता येते. तणावावर, टेन्शनवर काही सोल्युशन निघतं. म्हणून कोणताही चुकीचा निर्णय घेण्यापूर्वी वरील नंबरवर फोन करा.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

Leave A Reply

Your email address will not be published.