जब्बार चीनी, वणी: शहरालगत असलेल्या राजुर फाट्या पासून राजूर गावात जाणाऱ्या रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले आहे. त्या खड्ड्यात माती व मुरून भरून रस्त्याची डागडुजी करण्यात आली. मात्र पावसामुळे रस्त्यावरची माती आणि मुरूम वाहून गेल्याने रस्ता जैसे थे झाला आहे. त्यामुळे या रस्त्याने जाणा-या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
फाट्यपासून जाणारा गावात जाणारा रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरून लहान वाहनांसह मोठ्या वाहनांची वाहतूकही मोठ्या प्रमाणात होते. गावातील त्याच रस्त्यावरून भांडेवाड़ा खाणीकडे जाता येते. विशेष म्हणेज वेकोलिचे कर्मचारी आणि अधिकारीवर्गही याच मार्गाने येजा करतात. मात्र अधिकारीही या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. या रस्त्याची डागडुगी नाही तर इथे डांबरी रस्ता तयार करावा अशी अपेक्षा गावकरी व्यक्त करीत आहे.
रस्त्यावरचे अर्धेअधिक पथदिवे बंद
आधीच रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. त्यातच या रस्त्यावरचे अर्धे पथदिवे रात्री बंद आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे दिवसा खराब रस्त्यामुळे तर रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्याने राजूरवासियांना त्रास सहन कराव लागत आहे. मात्र राजुर कॉ येथील वेकोलि प्रशासन अद्यापही याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन स्थानिक रहिवाशांच्या संयमाचा अंत पाहू नये अशी संतप्त प्रतिक्रिया गावातून उमटत आहेत.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)