जितेंद्र कोठारी, वणी: सोनू आणि मृतक अतूलचे प्रेमसंबंध होते. त्यातून त्यांच्यात पैशाची देवानघेवाण झाली. सोनूने अतुलकडून 10 हजार रुपये उसणे घेतले होते. मात्र पैसे परत करण्यावरून प्रियकर प्रेयसीत वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी दुपारी दोघांमध्ये यावरून चांगलाच वाद झाला. सोनूने आपल्या वडिलांना बाहेरगावाहून घरी बोलावून घेतले. त्यांनी आणखी एकाला सोबत घेऊन कारने ते तिचे वडील रात्री घरी पोहोचले. मात्र पैशाचा वाद काही मिटला नाही. अखेर रात्री झोपडीतच यातील एकाने अतुलचे हात पकडले, एकाने खाली पाडले तर एकाने त्याच्या तोंडावर उशी दाबून अतुलचा खून करत त्याला यमसदनी धाडले.
आधी प्रेमसंबंधाच्या ऍन्गलने वणी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. प्रेयसी आणि तिचा भाटवा याला अटक केल्यानंतर पैशाचा ऍन्गलही समोर आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी सोनूचे वडील राजेश आनंदराव वाघमारे (41) व शंकर नथ्थूजी वरगणे (38) दोघेही रा. मदना ता. आर्वी जिल्हा वर्धा यांना अटक केली. त्यामुळे अतुल खोब्रागडे खून प्रकरणी आता आरोपींची संख्या 4 झाली आहे.
राजूर (कॉलरी) येथे चुनाभट्टी परिसरात 20 डिसेंबर रोजी अतुलचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळला होता. पोस्ट मॉर्टम रिपोर्टनंतर सदर मृत्यू हा खून असल्याचे समोर आले. त्यावरून वणी पोलिसांनी अतुलची प्रेयसी चुनाभट्टी मजूर सोनु सरवणे आणि तिच्या बहिणीच्या नवरा हर्षद जाधव याला ताब्यात घेतले होते. आधी दोन दिवस त्यांनी तोंड उघडले नाही. मात्र थोडासा पोलिसी खाक्या दाखवताच दोघांना वाचा फुटली. ते पोपटासारखे बोलू लागले व हे संपूर्ण प्रकरण समोर आले.
त्यानंतर पोलीस कोठडीत कसून चौकशी केली असता अतुल खोब्रागडेच्या खुनात सोनूचे वडील राजेश वाघमारे आणि त्याचे साथीदार शंकर वरगणेही सहभागी असल्याची बाब समोर आली. पोलीस चौकशीत मृतक अतुल खोब्रागडे यांनी प्रेयसी सोनुला उसनवारी दहा हजार रुपये दिले होते. आणि पैसे परत करण्याच्या वादावरून हत्याकांड घडल्याची कबुली आरोपियानी दिली.
सदर प्रकरणाची तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार, पोलीस निरीक्षक शाम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात एपीआय माया चाटसे, पीएसआय आशिष झिमटे, एएसआय प्रभाकर कांबळे, अमोल नुनेलवार, अविनाश बानकर, अमोल अनेरवार यांनी करून 6 दिवसात सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या.
हे देखील वाचा:
दारुच्या पव्व्याने केला घात, अपघातात काच पोटात जाऊन तरुणाचा मृत्यू
Comments are closed.