”जातनिहाय जनगणनेची आवश्यकता का” विषयावर व्याख्यान

शनिवारी कुणबी समाजभवनात होईल कार्यक्रम

0

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: ओबीसी(व्हीजे,एनटी,एसबीसी) जातनिहाय जनगणना कृती समितीद्वारा उद्या शनिवार दि.७ नोव्हेंबर २०२० ला दुपारी १.०० वाजता “धनोजे कुणबी समाज भवन,वणी” येथे “मार्गदर्शपर सभा” होणार आहे. या सभेत ऍड. अंजली साळवे ह्या ओबीसी( व्हीजे,एनटी,एसबीसी)च्या जातनिहाय जनगणनेची आवश्यकता का? या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

सभेत कोरोना लॉकडाऊनच्या सरकारी नियमावलीचे पालन केले जाणार आहेत; तरी सर्व समाजबांधवांनी आणि समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी सभेला परिवारासह आवर्जून उपस्थित राहावे आणि होणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आव्हाहन ओबीसी (व्हीजे, एनटी, एसबीसी) जातनिहाय जनगणना कृती समिती, वणीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.