राळेगावात व्हॉलीबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेच्या सराव शिबिराचे आयोजन

स्पर्धेसाठी तीन दिवसांच्या शिबिराचं आयोजन

0

 

राळेगाव, महेश भोयर: परभणी येथे महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनची राज्य अजिंक्यपद स्पर्धा होत आहे. १६ वर्षांच्या आतील मुले व मुलींची ही स्पर्धा आहे. त्यानिमित्त राळेगाव शहरातील तालुका क्रीडा संकुलात सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे आयोजन नवोदय क्रिडा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या सराव शिबिरात १६ मुले व १६ मुलीनी सहभाग घेतला आहे.

राळेगावच्या संघाला शुभेच्छा देण्यासाठी शहरातील मान्यवर व्यक्ती येत आहे. माजी क्रीडामंत्री वसंतराव पुरके यांचेसह, राळेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार अशोक उइके, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार, अप्पर तहसीलदार हेमंत गागुर्डे, गटविकास अधिकारी विनोद खेडेकर, ठाणेदार संजय खंदारे, नगर पंचायत चे पदाधिकारी गुरुवारी भेट देऊन शुभेच्छा देणार आहेत.

हे शिबिर 14 ते 16 अशा तीन दिवसात चालणार असून शिबिर संपल्यावर 17 तारखेला संख परभणीसाठी रवाना होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.