‘तिला’ झाली गर्भधारणा, तरीही ‘तो’ लग्न करेना

लग्नाचे वचन देऊन तरुणीचे शोषण करणारा प्रेमवीर गजाआड

0

नागेश रायपुरे, मारेगाव: लग्नाचे वचन देऊन एका 24 वर्षीय तरुणीचे शोषण करणा-या प्रेमवीराला गजाआड करण्यात आले आहे. तालुक्यातील भुरकी पोड येथे ही घटना घडली. सुमारे दोन वर्षांपासून तो तरुणीचे लग्नाचे वचन देऊन शोषण करीत होता. दरम्यान पीडिता ही दोन महिन्याची गर्भवती राहिली. मात्र आरोपीने हात वर केल्याने अखेर प्रेमवीराविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय पीडितेने घेतला.

तक्रारीनुसार, भीमराव पांडुरंग आत्राम (28) हा रोहपट येथील रहिवाशी आहे. तो मजुरीचे काम करतो. दोन वर्षांआधी तो भुरकी पोड येथे कामासाठी जायचा. गावातच त्याच्या नातेसंबंधातील एक कुटुंब होते. त्यामुळे त्याची त्या घरी नेहमी ये-जा सुरू असायची. त्या कुटुंबात एक 24 वर्षीय तरुणी होती. दरम्यान त्याची त्या तरुणीसोबत चांगली मैत्री झाली व त्यांचे सूत जुळले.

भीमरावने त्या तरुणीस लग्नाचे वचन दिले. लग्न करतो म्हणत भीमरावने तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्तापित केले. सुमारे दीड वर्षांपासून त्यांच्यात संबंध होते. दरम्यान त्या तरुणीला गर्भधारणा झाली. पोटात गर्भ वाढत असल्याने पीडितेने भीमरावला लग्नासाठी प्रस्ताव ठेवला मात्र त्याने त्याने नकार दिला. वारंवार लग्नाबाबत बोलल्यावरही भीमराव सारखा हात वर करायचा. अखेर तरुणीने आपबिती तिच्या वडिलांना सांगितली. त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार करण्याचे ठरवले.

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याबाबत तरुणीने भीमराव आत्रामबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी भीमराव आत्रामवर भादंविच्या कलम 376, 376 (2) व एन. 417 नुसार गुन्हा दाखल केला व आरोपीस अटक केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार, उप निरीक्षक अमोल चौधरी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

हे देखील वाचा:

मोबाईल टॉवरला गणेशपूर येथील रहिवाशांचा विरोध

Leave A Reply

Your email address will not be published.