सावधान… धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले, गावक-यांना केले स्थानांतरीत

सेलू येथील 300 तर भुरकी येथील 462 नागरिक स्थानांतरित... रात्री पाटाळ्याच्या पुलापर्यंत येऊ शकते पाणी

जितेंद्र कोठारी, वणी: अपर वर्धा प्रकल्प मोर्शी. निम्न वर्धा प्रकल्प, धनोडी (आर्वी), बेंबळा प्रकल्प बाभूळगाव या धरणातून वर्धा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे वर्धा नदीची पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे रात्री पाटाळा नदीवरील पूल पाण्याखाली येऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर पाणी आल्यास रात्रीपासून वणी-नागपूर मार्ग बंद होऊ शकतो. दरम्यान खबरदारी म्हणून तालुका प्रशासनाने नदी काठावरील भुरकी आणि सेलु (खु.) गावातील नागरिकांना स्थानांतरीत केले आहे. आज दुपारी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. तसेच धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे सेलू आणि भुरकी गावात पाणी शिरायला सुरूवात झाल्याची माहिती मिळाली आहे. आपत्कालीन परिस्थितीत बचाव पथकाचे 15 प्रशिक्षित जवान आणि 3 बोट तयार ठेवण्यात आल्या आहेत.

सेलू (खू) गावातून 300 लोकांना तर भुरकी गावातून संपूर्ण खाली करण्यात आले आहे. 462 लोकांना आतापर्यंत स्थानांतरीत करण्यात आले आहे. सेलू येथील नागरिकांना नांदेपेरा येथील जिल्हा परिषद शाळेत स्थानांतरीत करण्यात आले आहे. तर अनेक कुटुंब आपल्या नातेवाईकांकडे दुसऱ्या गावी गेल्याची माहिती आहे. उर्वरित नागरिकांना सावर्ला येथील महाविद्यालयात स्थलांतरित करण्याची प्रशासनाची तयारी आहे. त्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. रात्री पर्यंत पाटाळा नदीवरील पुलापर्यंत पाणी येऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर पाणी आल्यास पुन्हा वणी-नागपूर हा मार्ग बंद होऊ शकतो. पाणी पातळी वाढल्यास दुसऱ्या टप्यात झोला व कोना गावातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात येईल अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. दरम्यान रात्री 8 पर्यंत पाटाळ्याचा पूल पाण्याखाली जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संध्याकाळी 6.30 वाजता पाटाळ्याचा पूल

झरी तालुक्यातील काही गावांनाही धोका
पैनगंगा नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पैनगंगा नदीवरील इसापूर धरण 90 टक्के भरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरण पाणलोट क्षेत्रात सततच्या पावसामुळे धरणात पाणीपातळीत वाढ होत आहे. मात्र अद्याप धरणाचे दरवाजे उघडले नसल्याने सध्यातरी कुठलाही धोका नाही. मात्र सतर्कता म्हणून प्रशासन सज्ज आहे.

वणी तालुक्यात शुक्रवारी रात्री पासून पाऊस
शुक्रवारी रात्री पासून वणी तालुक्यात पाऊस सुरू आहे. शुक्रवारी ते रविवार असा पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता. वणी शहर व तालुक्यात शुक्रवारी रात्री पासून पावसाला सुरुवात झाली. शनिवारी काही काळासाठी पाऊस थांबला होता. त्यानंतर दिवसभरात काही वेळा रिमझिम पाऊस आला. मात्र आज रविवारी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान शहरात पावसाला सुरुवात झाली. एक ते दीड तास हा पाऊस सुरु होता. एकीकडे धरणाचे दरवाजे उघडे केले गेले आहे. तर दुसरीकडे पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीकाठचे गावे दहशतीत आले आहे. 

हे देखील वाचा:

संतापजनक – अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार

एस.बी. लॉनजवळ क्रिकेट सट्टा अड्डयावर पोलिसांची धाड

Comments are closed.