विवेक तोटेवार, वणी: महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावर कोरोना माहामरीचे संकट आहे. लॉकडाऊनच्या काळात टाळेबंदीमुळे कित्येक लोकांचे रोजगार बंद झालेत, नोकऱ्या गेल्यात. संपूर्ण जीवन विस्कळीत झाले. सरकारने मात्र यावर उपाय करत लोकांची उपसमार होऊ नये या हेतुने राशन दुकानांना ज्यादा धान्य वाटप व मोफत धान्य वाटप करण्याचे निर्देश दिले. तेवढे धान्यसुद्धा राशन दुकानदारांना पुरविण्यात येत आहे. पण या योजनांना खीळ लावण्याचं काम काही दुकानदार करीत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या भावापालीकडे अवाच्या सव्वा दराने धान्याची विक्री होत आहे.
कमी धान्य पुरविणे, खरेदी केलेल्या धान्याची पावती न देणे, नियमित वेळेवर दुकान न उघडणे, दुकानात येणाऱ्या लाभधारकांशी उद्धट वागणे, अशा प्रकारचे गैरव्यवहार रोजरास सुरू आहे. हे गैरव्यवहार थांबवण्यासाठी आणि नियमांचे उल्लघन करणाऱ्या दुकानदारावर कड़क कारवाही करण्यासाठी युवकांनी तहसीलदार यांना निवेदन दिले.
सोबतच खालील मागण्यासुद्धा करण्यात आल्यात. १) प्रत्येक परवानाधारक राशन दुकानात तक्रार क्रमांक असावा. २) धान्य उपलब्ध झाले आहे याची माहिती मिळण्याकरिता एस.एम.एस.ची सुविधा सुरु करण्यात यावी. ३) व्यापारी लोकांचे रास्त धान्याचा परवाना रद्द करुन ते महिला बचतगटांकडे देण्यात यावे. ४) बरेच लोक रास्त धान्याच्या लाभापासून वंचित आहेत. त्यासाठी सरकारकडे वाढीव कोट्याची मागणी करण्यात यावी. निवेदन देताना शुभम गावंडे, गीतेश वैद्य, संदीप गोहोकार, गौरव ताटकोंडावर,विजय दोडके, रुपेश पचारे, सुदाम गावंडे, नितीन तुराणकर उपस्थित होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)