बहुगुणी डेस्क, वणीः अकरावी विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्त्वात वणी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात हे निवेदन दिले.
अकरावीच्या प्रवेशासाठी काही विद्यार्थी अडचणीत आले. त्यांची ही समस्या समजून घेत डॉ. महेंद्र लोढा यांनी त्वरीत पावले उचललीत. या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे. ते विनाअनुदानित तुकड्यांमध्ये प्रवेश घेऊ शकत नाही. ही प्रक्रिया ऑनलाईन होती. त्यामुळे अनेक अडचणी आल्यात. या विद्यार्थ्यांचा प्रवेश होऊ शकला नाही.
या विनाअनुदानित तुकड्यांमधील पटसंख्या 10 ने वाढवून देण्याची मागणी डॉ. लोढा यांनी निवेदनातून केली. याची प्रत शिक्षण उपसंचालक अमरावती यांना पाठविण्यात आली.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंनादेखील पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी निवेदन
वणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंना सोबतच पदवीधर विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी एक स्वतंत्र निवेदन दिले. या निवेदनात शहरातील एकमेव मोठं कॉलेज लोकमान्य टिळक महाविद्यालयात पदवीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता वाढवावी अशी मागणी डॉ. महेंद्र लोढा यांनी केली आहे. परिसरात बी.एस.सी, बी. कॉम आणि बी.ए. ही पदवी घेण्याकरिता वणी शहरासह परिसरातील अनेक विद्यार्थी येतात. दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या ही वाढतीच आहे. त्यामुळे 10 टक्के कोटा वाढवावा अशी मागणी डॉ. लोढा यांनी केली आहे.
डॉ. महेंद्र लोढा हे त्यांच्या विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक चळवळीत सक्रीय आहेत. ते अजूनही विविध शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्य करीत आहेत. परिसरातील अनेक अंगणवाड्या त्यांनी दत्तक घेतल्या आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी हे निवेदन दिले आहे. यावेळी त्यांच्यासोबत अनेक विद्यार्थी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते.