मित्रानेच केला मित्राचा घात, परिसरात खळबळ

रविनगरमध्ये आढळला होता तरुणाचा मृतदेह

0

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरातील नांदेपेरा रोडवरील रविनगर परिसरात एका तरुणाचा मृतदेह वाढल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या चार दिवसात ही दुसरी खुनाची घटना घडली आहे. त्यातच हा खून मित्रानेच केल्याचे तपासात उघड झाले आहे.

अनिल आसुटकर हे रविनगर मध्ये राहतात. त्याच्या घरी वरच्या मजल्यावरच्या खोल्या किरायाने दिलेल्या आहेत. यातील एक खोलीत करण कश्यप (30) आर्वी जि. वर्धा हा राहतो. तर सतीश नामदेवराव देवासे (25) रा. मोर्शी जि. वर्धा इथला रहिवाशी आहे. हे दोघेही स्पंदना स्फुर्ती फायनान्स कंपनी येथे काम करत होते. करण हा चंद्रपूर तर सतीश हा वणीत काम बघत होता. सतिशचे करणवर उधारी होती. पैशाची गरज असल्याने सतिश नेहमी करणकडे पैशासाठी तगादा लावायचा. रविवारी 3 नोव्हेंबरला करण व त्याचा मित्र सतीशला घेऊन खोलीत आला. तिथे त्याने सतिशचा गळा आवळून खून केला व तो पसार झाला.

त्यानंतर घाबरलेला करण हा करण हा बाहेरगावी निघून गेला. सोमवारी तो खोलीवर आला व त्याने बघितले की सतिशच्या मृतदेहाची वास येत आहे. याबाबत घरमालकाला विचारणा केली असता. यावर खोलीत घुस मेल्याची बतावणी त्याने केली. त्याने मृतदेह पोत्यात भरून नेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला ते जमले नाही. त्यामुळे त्याने तिथून पोबारा केला.

घरमालकाला संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली. त्यांना खोलीत एक अज्ञात मृतदेह दिसला. पोलिसांनी त्वरित तपसचक्र फिरवीत आरोपीचा शोध घेणे सुरू केले. पोलिसांनी आरोपी करणच्या फोन लोकेशनची मदत घेतली. त्यांना आरोपी नागपूर येथे असल्याची माहिती मिळाली. आरोपीच्या शोधासाठी पोलीस टीम घेऊन नागपूरला गेले. तिथे करण काचिपुरा भागात त्याच्या मामाच्या घरी लपून असलेला आढळला.

पोलिसांनी आरोपी करणला विचारपूस करता त्याने आधी तो मी नव्हेच ही भूमिका घेतली. मात्र त्याला पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. सतिशने पैसे उधार दिले होते. ती उधारी तो वारंवार मागत होता. त्यामुळे सतिशचा काटा काढायचे ठरवले व रविवारी वेळ बघून त्याची हत्या केल्याची कबुली आरोपीन दिली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नाईक, ठाणेदार वैभव जाधव, इकबाल शेख, सुधीर पांडे, सुनील खंडागळे यांनी केली. या खून प्रकरणातही पोलिसांनी केवळ काही तासांमध्येच आरोपीला शोधून काढल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.

पैशाच्या वादातून मित्राच्या हत्येची दुसरी घटना
चार दिवसांआधी केवळ चार हजारांच्या उधारीसाठी मारेगाव येथील योगेश गहुकर याची हत्या करण्यात आली होती. या घटनेची शाई वाळत नाही तोच रविनगर भागात पु्न्हा हत्येची घटना समोर आली आहे. ही हत्याही पैशाच्या वादातून झाली होता.

Leave A Reply

Your email address will not be published.