जब्बार चिनी, वणी: तालुक्यातील उमरी (कायर) गावात मुंबई हुन आलेल्या दोन व्यक्तींचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आहे. त्यामुळे वणीतील प्रशासनाने सुटकेचा श्वास टाकला असून या दोघांनाही आता संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
19 मे ला त्यालुक्यातील उमरी गावातील एका कुटुंबात चार व्यक्ती मुंबई हुन आल्याचे कळताच त्यांना गावातील जिल्हा परिषद शाळेत कॉरटांईन करण्यात आले होते. 20 तारखेला सकाळी यातील दोन महिलेंची तब्येत बिघडली. सदर महिलाना कोरोनासदृश्य लक्षणे आढल्याने गावातील लोकांनी याची माहिती आरोग्य विभागाला दिली. आरोग्य विभागाने ताबडतोड या दोन महिलांना पांढरकवडा उपजिल्हा रूग्णालय येथे आयसोलेशन मध्ये पाठविण्यात आले. त्याच दिवशी त्याच्या स्वॅबचे नमुने घेऊन ते तपासणी साठी यवतमाळ येथे पाठविण्यात आले होते.
उमरी येथील त्या संशयित कोरोना रूग्णामुळे संपूर्ण उपविभागात खळबळ उडाली होती. नागरीकांना कोरोना आपल्या जवळ येऊन ठेपला असल्याची भिती निर्माण झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून गावातील नागरिकांनी गाव सील केले होते. तर प्रशासनाचेही धाबे दणाणले होते. मागील तीन दिवसांपासून गावातील एकही व्यक्ती गावाच्या बाहेर जात नव्हता आणि बाहेरील कोणत्याही व्यक्तीस आत प्रवेश नव्हता. मात्र त्या दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे.