मुकुटबन-अडेगावसह परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करा
वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा
सुशील ओझा, झरी: मुकुटबनसह परिसरातील अडेगाव, खातेरा, मांगली व इतर गावात गेल्या एक महिन्यांपासून लपंडाव सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत संतप्त ग्राहकांनी वीज वितरण विभागाला निवेदन देऊन समस्या सोडवण्याची मागणी केली आहे. जर मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
वीज वितरणाच्या भोंगळ कारभारामुळे अनेकांना वाजवी पेक्षा अधिक बिल आले आहे. तर त्यामुळे अनेकांनी मीटर बदलून देण्यासाठी तक्रार दिली आहे. मात्र तरी देखील मीटर बदलून देत नसल्याचा आरोप ग्राहक करीत आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई व ग्राहकांनी मुकुटबन येथील कार्यलयात याबाबत निवेदन देऊन तक्रार केली. जर विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही निवेदनातून दिला आहे.
हे देखील वाचा:
मारेगावात ‘पव्वा’ व ‘टील्लू’ चढ्या दरात, गोरगरिबांच्या खिशाला चोट
मुलाचे हैवानी कृत्य… ब्राह्मणी परिसरात जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार