शुल्लक वादातून नातेवाईकांचा वाद पोहचला मारहाणीपर्यंत

एक घटना टाकळी तर दुसरी घटना मार्डी येथील

बहुगुणी डेस्क, वणी: शुल्लक वादातून शेजारी राहणा-या दोन कुटुंबीयांतील वाद मारहाणीपर्यंत पोहोचला. यातील एक घटना ही पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या टाकळी येथे घडली. या प्रकरणी नातेवाईक असलेल्या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरी घटना मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील आहे. यात चुलत भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी दिनांक 28 जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास या दोन्ही घटना घडल्या.

टाकळी येथील घटना: तक्रारदार रेखा दुधबावणे (वय 37) या टाकळी ता. झरी येथील रहिवासी आहे. त्या शेतातून घरी परतल्यानंतर घराबाहेर पाय धुत होत्या. दरम्यान शेजारी राहणारे त्यांचे नातेवाईक संदीप पोचीराम दुधबावणे (वय 30) याने “पाणी आमच्या घराकडे येते” असा आरोप करत रेखाशी वाद सुरू केला. रेखा यांनी पाणी नालीत जाते, यामुळे त्रास होत नसल्याचे सांगितले. यावर संदीपने त्यांच्यावर हल्ला चढवला, केस धरून डोके भिंतीवर आपटले आणि अश्लील शिवीगाळ केली.

दरम्यान आरोपीचे इतर नातेवाईक आले. यात महिलांचा देखील समावेश होता. त्यांनी रेखा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. रेखा यांनी पाटण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सात आरोपींविरोधात बीएनएसच्या कलम 115(2), 189(2), 351(2) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मार्डी येथील घटना: तक्रारदार शेखर मुरलीधर कोयचाडे हे मार्डी ता. मारेगाव येथील रहिवासी आहे. त्यांच्या घराशेजारी त्यांचा चुलत भाऊ अरुण गोविंदा कोयचाडे (वय 36) राहतो. अरुण हा शेखर यांच्या घराच्या अंगणातून जात होता. दरम्यान शेखऱ याने त्याला अंगणातून जाऊ नको असे सांगितले. यावर अरुणने वाद घालत शिवीगाळ केली आणि घरातून वेळवाची काठी आणून शेखरच्या पाठीवर मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत शेखरच्या पाठीवर गंभीर इजा झाली. वैद्यकीय प्रमाणपत्र जोडल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 118(1) 351(2) 351(3) 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

आयुर्वेदिक उपचाराने 70 वर्षीय डायबेटिक आजोबांची जखम तीन महिन्यांत बरी

Comments are closed.