रेतीची तस्करी करणारे दोन टॉक्टर ताब्यात

मंडळ अधिका-यांची दापोरा शिवारात कारवाई

भास्कर राऊत, मारेगाव: रेतीची तस्करी करताना तालुक्यातील दापोरा शेत शिवारात दोन ट्रॅक्टर पकडून कार्यवाही करण्यात आली. हे दोन्ही ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.

तालुक्यामध्ये रेतीची अवैधरित्या तस्करी राजरोसपणे सुरू आहे. यात कधी धाड टाकून कारवाईचा बडगा उगारला जातो तर कधी मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते. अशातच आज मार्डी मंडळाचे महसूल मंडळ अधिकारी ए वाय घुगाने यांनी दापोरा शिवारात ही कारवाई केली. ते आज कर्तव्यावर असताना त्यांना दापोरा शिवारात नवीन पासिंग असलेले व वाहनावर कसलेही नंबर नसलेले ट्रॅक्टर रेतीची चोरी करताना आढळून आले.

यातील एक ट्रॅक्टर पूर्ण भरलेले होते तर दुसरे अर्धे भरलेले आढळून आले. हे ट्रॅक्टर रामदास गणपत चौधरी व अनिकेत कमलाकर झाडे दोघेही रा चिंचमंडळ यांचे मालकीचे असल्याचे तपासात समोर आले आहे. महसूल विभागाने कार्यवाही करीत सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे.

हे देखील वाचा:

मारेगावातील 3 प्रभागासाठी विक्रमी मतदान, आज लागणार निकाल

परमेश्वरी जगमोहनजी पोद्दार यांचे निधन

Comments are closed.