शुद्ध पाण्याच्या ‘कॅन’वर हरित लवादाचा ‘हातोडा’

केव्हाही बंद होऊ शकते तुमचे कॅनचे पाणी...

0

जितेंद्र कोठारी, वणी:  रस्त्यावरील गाडीवर लाऊड स्पिकरवर मोठ्या आवाजात एखादे गाणे ऐकू आले, की आपल्याला लगेच कळते की पाण्याची गाडी आली.  आपण या गाडीची वाट बघत असतो. अगदी मोजक्या दरात थंडगार पाणी आपल्याला मिळते. तर अनेकांच्या घरी  कॅनचे पाणी येते. तर काहींकडे मोठ्या जारद्वारे पाणी येते. मात्र हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने यावर बंदी आणली गेली आहे. सध्या हे पाणी अनधिकृतरीत्या आपल्याला पुरवले जाते, यावरही आपला विश्वास बसणार नाही. मात्र सत्य हेच आहे.

राज्यात शुद्ध व थंड पाण्याच्या नावावर आरओ प्लान्टद्वारे पाणी पुरवठा करणा-या कोणत्याही कारखान्याला अधिकृत परवानगी नाही. शिवाय केवळ वणी परिसरातच नाही तर संपूर्ण राज्यात हे धंदा अनधिकृतरित्या सुरू आहे. हे सुरू असलेले प्लान्ट त्वरित बंद करण्याचे आदेश ‘राष्ट्रीय हरित लवादा’ (NGT) यांनी दिले आहे.

एनजीटीने प्रदूषण नियंत्रण मंडळ, एफडीए आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना आईएसआई मार्क बॉटलबंद पाण्याचे कारखाने सोडून कॅनमध्ये विकल्या जाणाऱ्या पाण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अशुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्या प्लान्टवर कारवाई नक्की कोणी करायची? यावरून प्रदूषण नियंत्रण मंडळ, एफडीए (अन्न व औषध प्रशासन) आणि स्थानिक स्वराज्य संस्था जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न करताहेत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न अधांतरी आहे. शिवाय यामुळे आरोग्यसुद्धा धोक्यात येऊ शकतं.

वणी तालुक्यात मागील 5 वर्षात ठिकठिकाणी अनेक आरओ प्लांट सुरू झालेत. सुरवातीला लग्न समारंभ व इतर कार्यक्रमात थंड पाण्याचे जार वापरले जात होते. परन्तु कालांतरमध्ये शुद्ध व थंड पाण्याने दैनंदिन जीवनात प्रवेश केला. भारतीय मानक ब्युरो, अन्न व औषधी प्रशासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेकडून कोणतीही परवानगीशिवाय सुरू आर.ओ. प्लांट मधील पाण्याची शुद्धतेबाबत नेहमी शंका उपस्थित केली जात असे. मात्र सर्व प्रशासनिक संस्थांनी या गंभीर बाबीकडे डोळेझाक केली.

राष्‍ट्रीय हरीत लवाद येथे दाखल प्रकरण क्र.75/2017 नुसार जल प्रदूषण अधिनियम 1974 व वायू प्रदुषण अधिनियम 1981 अन्‍वये पिण्‍याचे थंड पाणी कॅन-जारमध्‍ये विक्रीकरिता निर्माण करणारे उद्योग संदर्भात उपरोक्‍त याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने आरओ प्लान्टच्या पाण्यावर बंदी आणली आहे.

कॅनच्या पाण्यावर बंदी का?
पिण्‍याचे थंड पाणी कॅन, जारमध्‍ये विक्रीकरीता निर्माण करणारे उद्योग, व्यवसायामुळे पुरवठा होणारे पाणी मनुष्‍याचे आरोग्‍यास अपायकारक ठरत आहे. तसेच भूगर्भातून पाण्‍याचा उपसा अत्याधिक होत असल्याने विनापरवानगी सुरु असलेले प्‍लान्ट तत्‍काळ सिल करण्‍याचे आदेश देण्यात आले आले. तसेच या कारवाईचे अनुपालन अहवाल सादर करण्‍याचे आदेश राष्‍ट्रीय हरीत लवादाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाना दिले आहे.

ज्या क्षेत्रांमध्ये पाण्यातील एकूण विसर्जित घन कण म्हणजेच टीडीएसचे प्रमाण प्रति लीटर 500 मिलिग्रॅमपेक्षा कमी असेल, त्या क्षेत्रांमध्ये ‘रिव्हर्स ऑस्मॉसिस’ (आर.ओ.) तंत्राचा वापर केलेल्या जल शुद्धिकरण सयंत्रांच्या वापरावर बंदी आणावी, असे हरित लवादाचे मत आहे. टीडीएस प्रति लीटर 500 मिलीग्रॅमपेक्षा कमी असेल तर आरओ प्रणालीचा काहीच उपयोग नाही. यामुळे पाणी तर वाया जातं शिवाय पाण्यातील आवश्यक ते खनिजंही निघून जातात. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानंतर राज्यात तसेच यवतमाळ जिल्ह्यातसुद्दा अनेक नगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायतीने आपल्या क्षेत्रात सुरू आर.ओ. प्लांट सील करण्याची कारवाई केली आहे. परंतु वणी तालुक्यात अद्याप एनजीटीच्या आदेशाची अंमलबजावणी झालेली दिसत नाही.

आरओचे पाणी धोकादायक का आहे?
रिव्हर्स ऑसमोसिस (R.O.) पद्धतीने पाणी शुद्द करताना पाण्यातील सर्व खनिज पदार्थ बाहेर फेकले जाते. शरीरात खनिज नसल्यामुळे अशक्तपणा, थकवा, हाडाचे आजार तसेच हृदयाशी संबंधित आजार उद्भवू शकता. जार मधील पाणी किंवा घरातील वॉटर फिल्टर बसविल्यास लोकांना वाटते की ते स्वच्छ पाणी पितात. मात्र प्रत्यक्षात तो पाणी शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे. त्याकारनाणे एनजीटीने त्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले.

‘वणी बहुगुणी’ने याबाबत आधीच वृत्त प्रकाशित केले होते हे विशेष…

वणी शहरात “शुद्ध’ पाण्याचा ‘अशुद्ध” व्यवसाय

हे पण वाचा…

आज तालुक्यात 5 पॉजिटिव्ह

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.